---Advertisement---

किती गोड! पाकिस्तानी कर्णधाराच्या लेकीसोबत भारतीय खेळाडूंनी घालवला क्लाविटी टाईम, पाहा मन जिंकणारा व्हिडिओ

On: रविवार, मार्च 6, 2022 7:40 PM
---Advertisement---

न्यूझीलंडमध्ये सध्या आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ (ICC Women ODI World Cup) चा थरार सुरू आहे. ४ मार्चपासून या स्पर्धेची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी कट्टर प्रतिद्वंद्वी भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांचा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ७ विकेट्सच्या नुकसानावर २४४ धावा केल्या. प्रत्युत्तरात या आव्हानाचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या संघाला १३७ धावांवरच रोखले आणि तब्बल १०७ धावांच्या फरकाने हा सामना जिंकत विश्वचषक अभियानाची विजयी सुरुवात केली.

या सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंच्या प्रदर्शनाबरोबरच पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मरूफ (Bismah Maroof) हिची चिमुकली मुलगी (Bismah Maroof’s daughter) फातिमा (Fatima) ही देखील आकर्षणाचा विषय ठरली. भारतीय खेळाडूंनीही तिच्यासोबत खूप चांगला वेळ घालवला.

भारतीय खेळाडूंनी जिंकली मने
सामना झाल्यानंतर मरूफ पत्रकार परिषदेत व्यस्त होती. यावेळी पाकिस्तानच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्या मरूफच्या मुलीला म्हणजेच फातिमाला सांभाळत होत्या. तेव्हा भारतीय महिला क्रिकेटपटू फातिमाला (Indian Players Played With Fatima) भेटण्यासाठी गेल्या. हरमनप्रीत कौर, स्म्रीती मंधाना, यष्टीरक्षक ऋचा घोष, शेफाली वर्मासह बऱ्याचशा भारतीय खेळाडू फातिमासोबत खेळताना दिसल्या. त्यांनी फातिमासोबत सेल्फीही काढला. आयसीसीने त्यांच्या या क्षणाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सामन्यादरम्यानही भारतीय खेळाडू फातिमासोबत खेळताना दिसल्या. एकता बिष्ट सामन्यादरम्यान फातिमासोबत खेळताना दिसली. फातिमाही एकतासोबत खेळताना हसताना दिसली. भारताची अनुभवी गोलंदाज झूलन गोस्वामी हिनेही फातिमासोबत चांगला वेळ घालवला. 

पाकिस्तानी कर्णधाराने मुलीबद्दल दिली मोठी प्रतिक्रिया
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत पाकिस्तान संघाची कर्णधार मरूफला तिच्या लेकीबद्दल प्रश्नही विचारण्यात आले. पत्रकार परिषदेत ती म्हणाली की, तिला माहिती नव्हते की, तिच्या लहान मुलीवर कॅमेरांची नजर होती आणि ती सोशल मीडियावर इतक्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

“हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण होता. ही खून वेगळी आणि खास भावना होती. पुन्हा विश्वचषकात खेळून चांगले वाटले. माझी आई आणि मुलगी या क्षणी माझ्यासोबत होत्या. मला या सामन्यात काहीतरी खास करायचे होते,” असे ती सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या-

भन्नाटच! पाकिस्तान विरुद्ध भारतीय यष्टीरक्षक ऋचा घोषचा अचंबित करणारा झेल, पाहा व्हिडिओ

टीम इंडिया है ये, झुकेगी नहीं…! मोहाली कसोटी विजयानंतर विराटचे ‘पुष्पा सेलिब्रेशन’, व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानविरूद्ध विजय मिळवल्यानंतर भारतीय महिला खेळाडूंच होतंय कौतुक; वीरू अन् भज्जीनेही गायले गुनगाण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---