भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला आहे. २ वर्षांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून विजय मिळवला आहे. यासह आयसीसीने आयोजित केलेल्या नव्या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीचा विजेता म्हणून न्यूझीलंड संघाचे नाव इतिहासात कोरले गेले आहे. तसेच या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करणाऱ्या बीजे वॅटलिंगने या सामन्यात मोठा पराक्रम करत एमएस धोनीला मागे टाकले आहे.
न्यूझीलंड संघाचा यष्टिरक्षक फलंदाज बीजे वॅटलिंग याने गेली १२ वर्षे न्यूझीलंड संघासाठी क्रिकेट खेळले आहे. सलामी फलंदाज म्हणून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या या क्रिकेटपटूने यष्टिरक्षक म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. परंतु २३ जून हा त्याच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस ठरला आहे. या दिवशी न्यूझीलंड संघाने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्यात विजय मिळवला आहे. यासोबतच त्याने दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीचा विक्रम मोडून काढला आहे.
धोनीने आपल्या कसोटी कारकीर्दीत यष्टिरक्षक म्हणून १६६ डावांमध्ये २५६ झेल टिपले होते. तर बीजे वाटलिंगने अवघ्या १२७ डावात २५७ झेल टिपण्याचा पराक्रम केला आहे. या यादीत मार्क बाऊचर सर्वोच्च स्थानी आहे. त्याने ५३२ झेल टिपले होते.(Bj Watling breaks the record of ms dhoni of taking most catches in test cricket)
वॅटलिंगने आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात हा पराक्रम केला आहे. निल वॅगनरने टाकलेल्या चेंडूवर, जडेजा शॉट खेळण्याचा प्रयत्नात होता. परंतु चेंडू बॅटचा कडा घेत बीजे वॅटलिंगच्या ग्लोजमध्ये गेला होता. यासह त्याने अव्वल यष्टीरक्षकांपैकी एक असलेला धोनीला मागे टाकले आहे.
बीजे वॅटलिंगची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
बीजे वॅटलिंगने न्यूझीलंड संघासाठी एकूण ७५ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ३७.९ च्या सरासरीने ३७९० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ८ शतक आणि १९ अर्धशतक झळकावले आहेत. २०५ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. तसेच वनडे क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने २८ सामने खेळले आहेत. यात त्याने २४.९ च्या सरासरीने ५७३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याला ५ अर्धशतक झळकावण्यात यश आले आहे. बीजे वॅटलिंगला टी-२० क्रिकेटमध्ये जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने आपल्या टी-२० कारकिर्दीत ५ सामने खेळले. यामध्ये त्याला अवघ्या ३८ धावा करता आल्या.
महत्वाच्या बातम्या-
‘दादा’चे नव्या क्षेत्रातील पदार्पण टीम इंडियासाठी ठरलंय अनलकी, गमावल्यात ‘या’ २ महत्त्वाच्या स्पर्धा
कसोटी चँपियनशीप पराभवानंतरही कर्णधार विराट म्हणतोय, ‘माझ्या हा निर्णय योग्यचं होता’
‘विलियम्सन आणि कंपनी’ची कसोटी जेतेपदावर मोहोर, चॅम्पियन कर्णधाराने दिली पहिली प्रतिक्रिया