पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित सातव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत साखळी फेरीत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाने फाल्कन्स संघाचा तर द ईगल्स संघाने रिबाउंड ब्लॅक हॉक्स संघाचा पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाने फाल्कन्स संघाचा 4-3 असा पराभव करत स्पर्धेत दुसरा विजय संपादन केला. सिल्व्हर खुल्या दुहेरी गटात हर्षवर्धन आपटे व विनित रुकारी यांनी मंदार विंझे व राजशेखर करमरकर यांचा 21-20, 21-12 असा, तर गोल्ड खुल्या मिश्र दुहेरी गटात सुधांशू मेडसीकर व दिपा खरे यांनी पराग चोपडा व दिप्ती सरदेसाई यांचा 21-11, 21-12 असा पराभव करत सामन्यात आघाडी घेतली. सिल्व्हर मिश्र दुहेरी गटात प्रशांत वैद्य व तुषार मेगळे यांनी अभिषेक ताम्हाने व राहूल परांजपे यांचा 15-04, 15-05 असा पराभव करत संघाचा डाव भक्कम केला. सिल्व्हर खुल्या दुहेरी गटात आकाश सुर्यवंशी व आशय कश्यप यांनी आरुषी पांडे व निखिल चितळे यांचा 15-08, 15-06 असा पराभव करत संघाला विजय मिळवून दिला.
दुस-या लढतीत द ईगल्स संघाने रिबाउंड ब्लॅक हॉक्स संघाचा 4-3 असा पराभव करत स्पर्धेत दुसरा विजय मिळवला. गोल्ड खुल्या दुहेरी गटात बिपिन देव व तेजस चितळे यांनी अमोल मेहेंदळे व करण पाटील यांचा 21-05, 21-11 असा पराभव करत सामन्यात विजयी सुरूवात केली. वाईजमन गटात अविनाश दोशी व संजय फेरवानी यांनी बाळ कुलकर्णी व नरेंद्र पटवर्धन यांचा 21-14, 21-18 असा पराभव करत सामन्यात आघाडी घेतली. गोल्ड खुल्या दुहेरी गटात आर्य देवधर व बिपिन चोभे या जोडीने सिध्दार्थ निवसरकर व विक्रांत पाटील यांचा 21-16, 21-19 असा पराभव करत संघाला विजय मिळवून दिला.
अन्य लढतीत इम्पेरियल स्वान्स संघाने पेलिकन स्मॅशर्स संघाचा 5-2 असा पराभव केला तर स्कॅवेंजर्स संघाने अर्बन रेवन्स संघाचा 4-3 पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
साखळी फेरी:
ब्लेझिंग ग्रिफिन्स वि.वि फाल्कन्स 4-3
(गोल्ड खुला दुहेरी गट: कुणाल पाटील/प्रथम पारेख पराभूत वि आनंद घाटे/रणजीत पांडे 18-21, 18-21; सिल्व्हर खुला दुहेरी गट: हर्षवर्धन आपटे/विनित रुकारी वि.वि मंदार विंझे/राजशेखर करमरकर 21-20, 21-12; गोल्ड खुला मिश्र दुहेरी गट: सुधांशू मेडसीकर/दिपा खरे वि.वि पराग चोपडा/दिप्ती सरदेसाई 21-11, 21-12; वाईजमन: गिरिश करंबेळकर/राजेंद्र नखरे पराभूत वि अनिल देडगे/निलेश केळकर 15-21, 15-21; सिल्व्हर मिश्र दुहेरी गट: प्रशांत वैद्य/तुषार मेंगळे वि.वि अभिषेक ताम्हाणे/राहूल परांजपे 15-04, 15-05; सिल्व्हर खुला दुहेरी गट: आकाश सुर्यवंशी/आशय कश्यप वि.वि आरुषी पांडे/निखिल चितळे 15-08, 15-06; गोल्ड खुला दुहेरी गट: चिन्मय चिरपुटकर/जयदिप गोखले पराभूत वि मधुर इंगळहाळीकर/तन्मय आगाशे 19-21, 16-21);
द ईगल्स वि.वि रिबाउंड ब्लॅक हॉक्स 4-3
( गोल्ड खुला दुहेरी गट: बिपिन देव/तेजस चितळे वि.वि अमोल मेहेंदळे/करण पाटील 21-05, 21-11; सिल्व्हर खुला दुहेरी गट: अनिरूध्द आपटे/देवेंद्र चितळे पुढे चाल वि आलोक तेलंग/अशुतोष सोमण 1-0; गोल्ड खुला मिश्र दुहेरी गट: चेतन वोरा/गौरी कुलकर्णी पराभूत वि सारंग आठवले/राधिका इंगळहाळीकर 02-21, 11-21; वाईजमन: अविनाश दोशी/संजय फेरवानी वि.वि बाळ कुलकर्णी/नरेंद्र पटवर्धन 21-14, 21-18; सिल्व्हर मिश्र दुहेरी गट: विमल हंसराज/शिवकुमार जावडेकर पराभूत वि समिर जालन/अमर श्रॉफ 08-15, 10-15; सिल्व्हर खुला दुहेरी गट: आयुष गुप्ता/पार्थ केळकर पराभूत वि अनया तुळपुळे/ जयकांत वैद्य 15-13, 08-15, 13-15; गोल्ड खुला दुहेरी गट: आर्य देवधर/बिपिन चोभे वि.वि सिध्दार्थ निवसरकर/विक्रांत पाटील 21-16, 21-19).
इम्पेरियल स्वान्स वि.वि.पेलिकन स्मॅशर्स 5-2
(गोल्ड खुला दुहेरी गट: आदित्य काळे/अनिश राणे पराभूत वि. हर्षद बर्वे/प्रथम वाणी 21-19, 15-21, 18-21; सिल्व्हर खुला दुहेरी गट: प्रीती फडके/विनायक भिडे वि.वि.भाग्यश्री देशपांडे/नितल शहा 21-14, 21-08; गोल्ड मिश्र दुहेरी गट: तेजस किंजिवडेकर/आदिती रोडे वि.वि. प्रतीक धर्माधिकारी/चैत्राली नवरे 21-20, 21-15; वाईजमन: हेमंत पाळंदे/संदीप साठे पराभूत वि. सचिन जोशी/विनायक लिमये 10-21, 12-21; सिल्व्हर खुला मिश्र दुहेरी गट: विश्वेश कटक्कर/ईशान भाले वि.वि सचिन अभ्यंकर/ शरयु राव 15-09, 15-08; सिल्व्हर खुला दुहेरी गट: केदार देशपांडे/विक्रम ओगले वि.वि अंकुश मोघे/प्रियदर्शन डुंबरे 15-14, 15-13; गोल्ड खुला दुहेरी गट: मिहिर केळकर/तुषार नगरकर वि.वि नितिन कोनकर/सिध्दार्थ साठ्ये 09-21, 21-18, 21-15);
स्कॅवेंजर्स वि.वि अर्बन रेवन्स 4-3
(गोल्ड खुला दुहेरी गट: अमित देवधर/वृशी फुरीया वि.वि अनिकेत शिंदे/संग्राम पाटील 21-14, 21-14; सिल्व्हर खुला दुहेरी गट: अभिजीत राजवाडे/अनिश रुईकर पराभूत वि अनिकेत सहस्त्रबुध्दे/गिरिष मुजुमदार 15-21, 18-21; गोल्ड खुला मिश्र दुहेरी गट: तन्मय चोभे/शताक्षी किनिकर वि.वि केदार नाडगोंडे/सारा नवरे 21-08, 21-09; वाईजमन: रमन जैन/विरल देसाई पराभूत वि श्रीदत्त शानबाग/विवेक जोशी 13-21, 15-21; सिल्व्हर मिश्र दुहेरी गट: अनिश शहा/अमोल दामले वि.वि आनंद शहा/चिन्मय चोभे 15-14, 15-14, 15-13; सिल्व्हर खुला दुहेरी गट: कविता रानडे/तन्मय चितळे पराभूत वि देवेंद्र राठी/रोहित भालेराव 07-15, 06-15; गोल्ड खुला दुहेरी गट: मकरंद चितळे/मिहिर विंझे वि.वि अव्दैत जोशी/अजिंक्य मुठे 21-13, 21-10);