---Advertisement---

ज्या स्टेडियमवर धोनीच्या षटकाराने इंडियाला मिळवुन दिला विश्वचषक ते वानखेडे होणार क्वारंटाइन सेंटर

On: शनिवार, मे 16, 2020 12:05 PM
---Advertisement---

भारतातील मुंबई शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने मुंबई महानगरपालिकेने वानखेडे स्टेडियम क्वारंटाइन सुविधेसाठी आपल्या ताब्यात द्यावे अशी विनंती मुंबई क्रिकेट संघटनेला (mumbai cricket association) केली आहे.

वानखेडे स्टेडियमची प्रेक्षक बसण्याची क्षमता ३३ हजार असून येथेच भारतीय संघाने २०११मध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले होते.

covid19india.org वेबसाईटवरील माहितीप्रमाणे शुक्रवारपर्यंत एकट्या मुंबई शहरात सध्या १३८९१ कोरोना पेशंट सक्रिय असून आजपर्यंत १७६७१ जणांना याची बाधा झाली होती. यातील ३१२५ जण बरे होऊन घरी गेले आहेत तर ६५५ जणांचा मृत्यु झाला आहे.

मुंबई क्रिकेट संघटना ही भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना म्हणून ओळखली जाते. याच संघटनेने गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री व पंतप्रधान सहायता निधीला ५० लाख रुपयांची मदत देखील दिली आहे. तसेच अजून काही मदत लागली तर मुंबई क्रिकेट संघटना ती द्यायला तयार आहे.

सध्या चर्चगेटजवळ उभे असलेल्या या स्टेडियमची उभारणी २०११ विश्वचषकापुर्वी झाली आहे. त्यापुर्वी तेथे जुने स्टेडियम होते. सध्याचे सोयीसुविधांयुक्त असे हे स्टेडियम आहे.

यापुर्वी कोरोना बाधीतांना क्वारंटाइन करण्यासाठी इंग्लंड देशातील व पंजाब राज्यातील काही स्टेडियमचा वापर करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---