अमेरिकेचा टेनिसपटू बॉब ब्रायन हा यावर्षी फ्रेंच अोपन खेळणार नाही. पुरुष दुहेरीचा हा खेळाडू दुखापतीतून पूर्ण बरा न झाल्याने त्याने फ्रेंच अोपनमधून माघार घेतली आहे.
यामुळे त्याचा जोडीदार असणारा जुळा भाऊ माईकचा सॅम कूर्रे हा नवा जोडीदार असणार आहे. बॉब आणि माईक हे त्यांचे 77वे ग्रॅंड स्लॅम एकत्र खेळणार होते.
बॉबला माद्रिद अोपनच्या अंतिम सामन्यात दुखापत झाली होती. त्यावेळी त्यांनी पहिल्या सेटमध्ये 5-3 ने माघार घेतली होती. हा सामना अलेक्झांडर पेया आणि निकोला मेक्टिक यांच्या विरूध्द होता.
जर ते हा सामना जिंकले असते तर ते जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचे पुरूष दुहेरी इतिहासातील 40व्या वयाचे खेळाडू ठरले असते.
तसेत त्याने ट्विटर आणि इंस्टाग्राम वरून एक पोस्ट शेअर केली.यात त्याने फ्रेंच अोपन खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
I have good news and bad news. The bad news is… https://t.co/Ot7I48hG3Q
— . (@GoGalasGames) May 24, 2018
https://www.instagram.com/p/BjKybptg6zn/?hl=en&taken-by=bryanbros
ब्रायन बंधू हे 1999च्या अॉस्ट्रेलियन अोपन स्पर्धेपासून कोणत्याच स्पर्धेला मुकले नाही. या दरम्यान त्यांनी 16 पुरूष दुहेरीचे ग्रॅंड स्लॅम विजेतेुद जिंकले असून यात दोन फ्रेंच अोपनचा (2003, 2013) समावेश आहे.







