सध्या युगांडा पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी देखील सहभाग घेतला आहे. दरम्यान कंपालाच्या एका जिथे भारतीय खेळाडू थांबले आहेत. तिथे मंगळवारी (१७ ऑक्टोबर) बॉम्बस्फोट झाल्याचा प्रकार पाहायला मिळाला आहे.
या बॉम्बस्फोटमध्ये कमीत कमी ३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शहरात एकच गोंधळ उडाला आहे. भारतीय पॅरा बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक गौरव खन्ना यांनी म्हटले की, “हा स्फोट हॉटेल पासून जवळ जवळ १०० मीटर अंतरावर झाला. सुदैवाने सर्व सुरक्षित आहे. काळजी करण्यासारखं काही नाही.”
गौरव खन्ना यांनी म्हटले की, “काही खेळाडू बॅडमिंटन हॉलकडे जात असताना हे स्फोट झाले. त्यामुळे रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. आम्हीही लगेच माघारी परतलो, पण आता परिस्थिती ठीक आहे. आम्ही दूतावासाशी संपर्क केला आहे आणि काळजी करण्यासारखे काही नाही. याचा आमच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नाही आणि स्पर्धा सुरू राहील. ५४ खेळाडू असलेला आमचा संघ खूप मोठा आहे. जो या स्पर्धेत भाग घेत आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात तीन आत्मघाती हल्लेखोर मारले गेले आहेत.”
Indian Team is Safe!There is multiple Bomb Blast 100 mtr away from official Hotel in which @parabadmintonIN team staying incl. @GauravParaCoach
& @PramodBhagat83 @manojsarkar07@joshimanasi11@IndiainUganda@Media_SAI @ParalympicIndia @YASMinistry @IndiaSports @PMOIndia https://t.co/bAlsNdK4XS pic.twitter.com/TldWuwlXUn— Para-Badminton India (@parabadmintonIN) November 16, 2021
तसेच टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत मेडल पटकावणाऱ्या प्रमोद भगतने म्हटले की, “आम्ही सुरक्षित आहोत. स्फोट झाला होता, परंतु आता चिंता करण्यासारखी बाब नाही. यावर आमच्या वेळापत्रकावर परिणाम होणार नाही. गडबड झाली, पण सर्वजण सुरक्षित आहोत आणि स्पर्धा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार पार पडेल.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “आमच्या हॉटेलमध्ये १५ भारतीय खेळाडू आहेत. तर दुसऱ्या एका हॉटेलमध्ये १५ ते २० भारतीय खेळाडू आहेत.” तसेच भारतीय पॅरा बॅडमिंटनने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, “भारतीय संघ सुरक्षित आहे. अधिकृत हॉटेलपासून १०० मीटर अंतरावर काही बॉम्बस्फोट झाले. ही स्पर्धा २१ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
ऍशेस मालिकेत इंग्लंडला आव्हान देण्यास ऑस्ट्रेलिया सज्ज; पहिल्या २ सामन्यांसाठी संघाची घोषणा
रोहित शर्माच्या नेतृत्वात काय असेल विराट कोहलीची भूमिका? ‘हिटमॅन’ने दिले उत्तर
‘वडिलांचे स्वप्न पूर्ण करतोय’ म्हणत सचिन तेंडूलकरने उचलला ६५० गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च