पुणे, 10 डिसेंबर 2023: रग्बी इंडिया, स्पोर्टस ॲथोरिटी ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या खेलो इंडिया महिला रग्बी लीग स्पर्धेत वरिष्ठ महिला गटात बॉम्बे जिमखाना संघाने विजेतेपद संपादन केले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत बॉम्बे जिमखाना संघाने कोल्हापूर संघाचा 19-7 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. विजयी संघाकडून सारा डिसूझा(5गुण), सारा पठाण(5गुण), पायल कनोजिया(5गुण), प्रियांका हिरसे(4गुण) यांनी सुरेख कामगिरी केली
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ऋशाली जालगलकर(15गुण) हिने केलेल्या सुरेख खेळीच्या जोरावर ठाणे संघाने पुणे अ संघाचा 24-5 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला. याआधीच्या उपांत्य फेरीत कोल्हापूर संघाने पुणे अ संघाचा 28-0 असा तर, बॉम्बे जिमखाना संघाने ठाणे संघाचा 19-7 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण छत्रपती पुरस्कार विजेते भरत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
निकाल: वरिष्ठ महिला गट: उपांत्य फेरी:
कोल्हापूर: 28(पूनम पाटील 5, शुभांगी गावडे 8, कल्याणी पाटील 10, वैष्णवी पाटील 5) वि.वि.पुणे अ: 0;
बॉम्बे जिमखाना: 19 (उज्वला घुगे 10, प्रियांका हिरसे 4, सारा पठाण 5) वि.वि.ठाणे: 7 (सोनाली शेलार 7);
अंतिम फेरी: बॉम्बे जिमखाना: 19 (सारा डिसूझा 5, सारा पठाण 5, पायल कनोजिया 5, प्रियांका हिरसे 4) वि.वि. कोल्हापूर: 7 (कल्याणी पाटील 5, शुभांगी गावडे 2)
तिसरे व चौथे स्थान:
ठाणे: 24 (ऋशाली जालगलकर 15, सोनाली शेलार 9)वि.वि. पुणे अ: 5 (वाहबिझ भरुचा 5).
महत्वाच्या बातम्या –
डेव्हिड वॉर्नरचं मिचेल जॉन्सनला चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझ्या आई-वडिलांनी माझे…’
‘रोहित टी-20 विश्वचषकात नेतृत्व करू शकतो, पण…’, कर्णधाराच्या फॉर्मबाबत गंभीरचे मोठे विधान