सध्या भारतात आयपीएल 2023 चार हंगाम सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ सलग चार पराभवामुळे गुणतालिकेत अखेरच्या स्थानी आहे. त्यातच संघाचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिल आणि शॉ यांच्यातील वाद दोन महिन्यांपूर्वी समोर आला होता. आता याच प्रकरणात पृथ्वी याला मुंबई उच्च न्यायालयामार्फत नोटीस देण्यात आलीये.
सोशल मीडियाव इन्फ्लूएंसर व मॉडेल सपना गिल (Sapna Gill) हिने पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्यावर काही गंभीर आरोप केलेले. चुकीच्या पद्धतीने हात लावणे आणि धक्काबुक्कीचे आरोप सपनाकडून शॉविरोधात केले गेले आहेत. तसेच शॉने बेसबॉल बॅटने आपल्यावर हमला केल्याचेही सपनाने ओशिवरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलेले. तिने कलम 354, 509 आणि 324 अंतर्गत अंधेरी दंडाधिकाऱ्यांसमोर फौजदारी खटला दाखल केला आहे.
त्याचवेळी पृथ्वी आणि त्याच्या मित्रांकडूनही सपना व तिच्या साथीदारांविरोधात तक्रार दाखल केली गेली होती. ही तक्रार रद्द करण्यासाठी सपनाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. गुरुवारी (13 एप्रिल) या खटल्याची सुनावणी झाली. त्यानंतर पृथ्वी, त्याचे मित्र व काही पोलिस अधिकाऱ्यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे.
पृथ्वी शॉ याची 16 फेब्रुवारी रोजी रात्री विलेपार्ले येथील एका नाईट क्लबमध्ये काही लोकांशी बाचाबाची झाली होती. पृथ्वी शॉ याच्याशी हे लोक सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पृथ्वीने नकार दिल्यानंतर या आठ जणांनी मिळून त्याच्या मित्राच्या गाडीवर बेसबॉल बॅटने हल्ला केला. त्यानंतर ओशिवारा पोलीस ठाण्यामध्ये शॉ व त्याच्या मित्राने तक्रार दाखल केली होती. पृथ्वीचा त्यावेळी सपना गिल हिच्याशी वाद घालत असलेला व्हिडिओ देखील समोर आलेला. त्यानंतर पृथ्वीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सपना व तिच्या मित्रांना अटक केलेली.
(Bombay High Court Issue Notice To Cricketer Prithvi Shaw In Sapna Gill Controversy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीचे अभिनंदन! यॉर्कर टाकून राजस्थानला विजय मिळवून देणाऱ्या संदीप शर्माची पोस्ट व्हायरल
‘धोनी होता म्हणून…,’ सीएसकेला हरवल्यानंतर संदीप शर्माची सीएसके कर्णधाराविषयी काय म्हणाला