आगामी भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यामध्ये बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जाणार आहे. वर्षाच्या अखेरिस नोव्हेंबरमध्ये दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही अनुक्रमे पहिल्या दोन स्थानावर आहेत. बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीमध्ये दोन्ही संघात अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी बातमी समोर आली आहे की, ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही.
ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू कॅमरन ग्रीन (Cameron Green) इंग्लंडविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला. तो आगामी बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीत खेळण्याची शक्यता कमी आहे. कारण ग्रीनच्या पाठीला दुखापत झाली आहे. भारतीय संघ 2024च्या अखेरीस ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे, जिथे 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ग्रीनची दुखापत गंभीर राहिल्यास भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीला तो मुकू शकतो. मात्र, इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर ग्रीनने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला आहे.
Cameron Green doubtful for the Border Gavaskar Trophy due to back injury. (Espncricinfo). pic.twitter.com/1CzCvjznYF
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 27, 2024
बॉर्डर गावसकर मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधार रोहितच्या जडेजाबाबतच्या ‘त्या’ निर्णयावरुन भडकले मांजरेकर, थेट आकडेवारीच मांडली
कानपूर कसोटीत पुन्हा आठवला ‘गुटखामॅन’, 3 वर्षांपूर्वी झाला होता व्हायरल
‘या’ 3 खेळाडूंनी चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये ठोकले सर्वाधिक षटकार!