भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर मालिकेला 22 नोव्हेंबर 2024 पासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ज्यामध्ये शेवटचा सामना 03 जानेवारी 2025 पासून खेळवला जाईल. या ट्रॉफीपूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार पॅट कमिन्सने क्रिकेटमधून सुमारे दोन महिन्यांचा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला, जे खरोखरच धक्कादायक आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी कमिन्स स्वत:ला जास्तीत जास्त विश्रांती देण्याचा विचार करत आहे. जुलैमध्ये त्याने मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केले. परंतु सहा सामने खेळल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराने त्याचे नाव मागे घेतले. एवढेच नाही तर पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर होणाऱ्या 3 टी-20 आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपासूनही कमिन्स स्वतःला दूर ठेवणार आहे. ‘फॉक्स स्पोर्ट्स’शी बोलताना त्याने आपल्या ब्रेकबद्दल खुलासा केला.
पॅट कमिन्स म्हणाला, “ब्रेकनंतर जेव्हा तुम्ही पुनरागमन करता तेव्हा तुमची ताजे असता. तुम्हाला त्याबद्दल खेद वाटत नाही. मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपासून तब्बल 18 महिने गोलंदाजी करत आहे. ब्रेकदरम्यान मी गोलंदाजीपासून दूर राहीन. सात किंवा आम्हाला आठ आठवडे चांगला वेळ मिळेल आणि शरीर बरे होईल.”
तो पुढे म्हणाला, “मग उन्हाळ्याची तयारी सुरू होईल. असे केल्याने तुम्ही आणखी जास्त वेळ गोलंदाजी करू शकता. त्यामुळे गोलांदाजीच्या वेग राखणे सोपे जाते आणि त्यामुळे दुखापतीचा धोकाही कमी होतो.”
याआधी 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे आयोजन भारताने केले होते, ज्यामध्ये चार कसोटी सामने आयोजित करण्यात आले होते. टीम इंडियाने 2023 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 2-1 असा विजय मिळवला होता. आता 2024-25 मध्ये खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे यजमानपद ऑस्ट्रेलियाकडे असेल. मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये, दुसरा ॲडलेडमध्ये, तिसरा ब्रिस्बेनमध्ये, चौथा मेलबर्नमध्ये आणि पाचवा सामना सिडनीमध्ये होणार आहे.
हेही वाचा-
वनडेमध्ये 3 तर कसोटीत 2 वेळा ‘क्रिकेटर ऑफ द इयर’, विराटकडे चक्क इतक्या आयसीसी पुरस्कार
माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने निवडली टीम इंडियाची ऑलटाइम प्लेइंग-11, हा दिग्गज कर्णधार
दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने पाकिस्तानला धक्का, WTC गुणतालिकेत भारताचा खेळ बिघडला?