मुंबई | आज आयपीएल २०१८च्या प्ले-आॅफला सुरुवात होत आहे. प्ले-आॅफमधील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामना आज मुंबईमधील शेषराव वानखेडे स्टेडियमवर होत आहे. या सामन्याला प्ले-आॅफमध्ये क्वाॅलिफायर-१ असे म्हटले जाते.
यात जो संघ जिंकणार आहे तो थेट अंतिम सामन्याला पात्र ठरणार आहे. तर पराभूत संघाला क्वालिफायर-२ मध्ये पुन्हा खेळण्याची संधी मिळणार आहे.
हा चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीचा १०वा तसेच त्याचा संघसहकारी सुरेश रैनाचाही १०वा सेमीफायनल किंवा प्ले-आॅफचा सामना आहे.
आयपीएलच्या ११ पर्वात १० सेमीफानल किंवा प्ले-आॅफचा सामना खेळलेले धोनी आणि रैना हे दोनच खेळाडू आहेत. त्यांनी प्रत्येकी ८ सामने २०१५ पर्यंत चेन्नईकडून खेळले आहेत. तर धोनीने २०१७ला पुण्याकडून तर रैनाने २०१६ला गुजरातकडून प्ले-आॅफचा सामना खेळला होता.
११ आयपीएलमध्ये धोनी २०१६मध्ये तर सुरेश रैना २०१७मध्ये फक्त सेमीफायनल किंवा प्ले-आॅफचा सामना खेळला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
–जर्सी भारताची असो की चेन्नईची, धोनी विक्रम करताना काही थांबेना!
–तब्बल ११ आयपीएल वाट पहावे लागले आणि अखेर काल तो विक्रम घडलाच!
–व्हिडिओ व्हायरल- मुंबई हारली, पंजाब संघाची मालकीण प्रीती झिंटा खुष
–कोण आहे रोहित शर्मा? शेजारी बसलेल्या प्रवाशाने रोहितला पाहताच काय केले पहा?
–रैनाच आहे आयपीएल विक्रमांचा बादशाह, रोहितचा विक्रम दोन दिवसात मोडला