fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

८७ वर्षांत जे कुणालाही जमलं नाही ते विराटने करुन दाखवलं

अॅडलेड। भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध पहिला कसोटी सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात आज तिसऱ्या दिवशी(8 डिसेंबर) आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव 235 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारताने तिसऱ्या दिवसाखेर 166 धावांची आघाडी घेतली आहे.

यावेळी फलंदाजीला आलेल्या भारतीय कर्णधार विराट कोहलीने सर डॉन ब्रॅडमन यांचा 87 वर्ष जुना विक्रम तोडला आहे. त्याने आज 5वी धाव घेताना आॅस्ट्रेलियन भूमीत 1000 कसोटी धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.

ब्रॅडमन यांना आॅस्ट्रेलियन भूमीत 1000 कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी 10 सामने खेळावे लागले होते. त्यांनी 1931 मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध ही कामगिरी केली होती. कोहलीने मात्र 9च सामन्यातच 1000 कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. यावेळी तो 34 धावावर खेळताना नॅथन लायनच्या गोलंदाजीवर बाद झाला.

आॅस्ट्रेलियन भूमीत 1000 कसोटी धावा पूर्ण करणारा तो केवळ चौथा भारतीय आणि जगातील 17 वा फलंदाज ठरला आहे. याआधी भारताकडून सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांनी हा पराक्रम केला आहे.

कोहलीने ऑस्ट्रेलियात पाच शतकांच्या मदतीने 1000 कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. आतापर्यंत त्याने 73 कसोटी सामन्यात 54.57च्या सरासरीने 6331 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 24 शतकांचा आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच देश-विदेश भूमीवर कर्णधार पदावर असताना कोहली कसोटीमध्ये 2000 धावा करणारा पाचवाच कर्णधार ठरला आहे. याआधी अॅलन बॉर्डर, रिकी पॉटींग, ग्रॅम स्मिथ आणि अॅलिस्टर कूकने अशी कामगिरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

विराट कोहलीची कसोटीमध्ये या गोलंदाजाने केली आहे सर्वाधिक वेळा शिकार

असा पराक्रम करणारा कोहली ठरला केवळ चौथा भारतीय

किंग कोहलीचा आॅस्ट्रेलियामध्ये विराट विक्रम

You might also like