---Advertisement---

जडेजा बाद झाल्यानंतर या कारणामुळे भडकला विराट…

On: सोमवार, डिसेंबर 16, 2019 8:49 PM
---Advertisement---

रविवारी (15 डिसेंबर) एम चिदंबरम स्टेडियम, चेन्नई (MA Chidambaram) येथे भारत विरुद्ध विंडीज (India vs Windies) संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना पार पडला.  भारताला पराभूत करत विंडीजने हा सामना 8 विकेट्सने जिंकला. त्याचबरोबर, विंडीजने वनडे मालिकेत 1-0 ने आघाडीही घेतली.

प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 50 षटकांत 8 विकेट्स गमावून 287 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडीजने 47.5 षटकांत 2 गडी गमावून 291 धावा करून सामना जिंकला. या सामन्यादरम्यान रवींद्र जडेजाच्या धावबादवरून वाद (Controversy) निर्माण झाला.

ही बाब इतकी मोठी होती की भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) जडेजाच्या बाद झाल्यानंतर लगेच प्रतिक्रिया दिली आणि सामना संपल्यानंतरही त्यानी नाराजी व्यक्त केली.

खरं तर भारतीय डावाच्या 48 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) किमो पॉलच्या (Keemo Paul) गोलंदाजीवर 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तो रोस्टन चेसच्या (Roston Chase) थ्रोवर धावबाद झाला.

जेव्हा खेळाडूंनी मैदानावरील पंचांकडे (Umpire) अपील केले तेव्हा त्यांनी जडेजाला नॉटआऊट देण्यात आले. पंचांच्या निर्णयानंतर वेस्ट इंडीजचे खेळाडूही शांत झाले.

परंतु, जेव्हा जडेजा क्रीजवर पोहोचला नाही असे एका संघ सदस्याने पाहिले तेव्हा त्याने अन्य खेळाडूंना सांगितले. त्यानंतर विंडीजच्या खेळाडूंनी धावबादचे अपील केले आणि प्रकरण तिसऱ्या पंचांकडे गेले. तिसऱ्या पंचाने जडेजाला पुन्हा पाहून बाद घोषित केले. यावर भारतीय कर्णधार विराट कोहली खूप चिडला.

मैदानावरील निर्णय मैदानाबाहेरील कोणीही घेऊ शकत नाही. असे करणे चुकीचे आहे आणि जे काही घडले ते सामना रेफरी आणि पंचांनींच पाहिले पाहिजे, असे आपले मत मांडताना कोहली म्हणाला.

“दिवसाखेरीस योग्य निर्णय घेण्यात आला आणि ही माझ्यासाठी सर्वात महत्वाची बाब आहे,” असे कायरन पोलार्ड (Kieron Pollard) म्हणाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---