---Advertisement---

तीन मॅचमध्ये ५३८ धावा करणाऱ्या १६ वर्षीय खेळाडूला रैनाकडून गाॅगल भेट

On: मंगळवार, नोव्हेंबर 20, 2018 5:46 PM
---Advertisement---

उत्तर प्रदेशच्या १६ वर्षाखालील संघाचा कर्णधार समीर रिझवी सध्या मोठा चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे या खेळाडूने सध्या सुरु असलेल्या १६ वर्षाखालील विजय मर्चेंट ट्रॉफी स्पर्धेत पहिल्या तीन सामन्यात चक्क ५३८ धावा केल्या आहेत.

सोमवारी समीरने मेरठमधील भामाशाह पार्कवर सुरु असलेल्या सामन्यात २३८ चेंडूत २८० धावा केल्या. यात त्याने ३४ चौकार आणि ५ षटकार खेचले. त्रिशतकाला केवळ २० धावा बाकी असताना आणि दिवसातील केवळ २ षटकं बाकी असताना तो सोमवारी बाद झाला.

त्याच्या याच खेळाच्या जोरावर उत्तरप्रदेश संघाने पहिल्या डावात ४ बाद ४८९ धावा केल्या. याच सामन्यात उत्तराखंडचा पहिला डाव २२७ धावांतच संपुष्टात आला होता.

२०११मध्ये जेव्हा मेरठमधील गांधी बाग स्टेडियमवर उत्तर प्रदेश विरुद्ध सौराष्ट्र सामना झाला होता तेव्हा या सामन्यात सुरेश रैनाने या समीर रिझवीबरोबर झेल घेण्याचा सराव केला होता. त्याच्याकडे क्रिकेट खेळण्याची क्षमता पाहुन त्याला रैनाने तेव्हा गाॅगल भेट दिला होता.

आज हाच समीर रिझवी उत्तर प्रदेशच्या १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार झाला आहे.

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

निवृत्ती घेतलेला एबी आणि बंदी असलेला स्मिथ आता खेळणार या संघाकडून

२०११विश्वचषक विजेत्या टीम इंडियातील ३ खेळाडू आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत करणार समालोचन

एबी डिव्हिलियर्सच्या पुनरागमानाबद्दलच हे आहे मोठे वृत्त

Breaking- पहिल्या टी२० सामन्यासाठी टीम इंडियाच्या १२ खेळाडूंच्या नावाची घोषणा

वाढदिवस विशेष- कबड्डीतला धोनी: अनुप कुमार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment