ब्रिस्बेन | ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत टी-20 मालिका उद्यापासून सुरु होत आहे. भारतीय संघ आॅस्ट्रेलियात कधीही द्विपक्षीय टी२० मालिकेत पराभूत झाला नाही.
उद्या अर्थात २१ नोव्हेंबर रोजी भारतीय संघ पहिला सामना खेळणार आहे. यासाठी आज १२ खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा झाली. यात विकेटकीपर म्हणुन रिषभ पंतला संधी देण्यात आली. तर दिनेश कार्तिकला फलंदाज म्हणुन संघात स्थान देण्यात आले आहे.
फलंदाजीत सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा संघाची धुरा वाहणार आहे. तर मधल्या फळीत कर्णधार विराट कोहलीसह केएल राहुल, रिषभ पंत आणि दिनेश कार्तिकचा समावेश करण्यात आला आहे.
अष्टपैलू खेळाडू म्हणुन कृणाल पंड्यावर संघ व्यवस्थापनाने विश्वास कायम ठेवला आहे. दोन फिरकीपटूंमध्ये युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादवचा समावेश आहे. तरीही उद्या १२वा खेळाडू म्हणुन चहलला संघाबाहेर बसावे लागु शकते.
याच पार्श्वभूमीवर विराट कोहलीची टीम इंडिया आॅस्ट्रेलियाशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्याच आठवड्यात संघ येथे पोहचला अाहे.
१२ खेळाडूंचा संघ-
विराट कोहली (कर्णधार), रोहित उपकर्णधार, शिखर धवन, केएल राहुल, रिषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, युझवेंद्र चहल
We've announced our 12 for the 1st T20I against Australia at The Gabba #TeamIndia pic.twitter.com/c6boLtieGf
— BCCI (@BCCI) November 20, 2018
वाचा महत्त्वाच्या बातम्या-
–वाढदिवस विशेष- कबड्डीतला धोनी: अनुप कुमार
–तर आणि तरच टीम कोहलीकडून होणार तगडा विक्रम...
–आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या हिटमॅन रोहित शर्माची अस्सल मराठी प्रतिक्रिया
–महिला टी२० विश्वचषकच्या अशा होणार सेमीफायनल
–मुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय






