आबू धाबी | पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने ४ धावांनी शानदार विजय मिळवला.
शेवटची विकेट बाकी असताना पाकिस्तानला जिंकण्यासाठी ११ धावांची गरज होती. मैदानावर अझर अली आणि मोहम्मद अब्बास हे खेळाडू होते. त्यात अझर अली तर १३६ चेंडूत ६५ धावांवर खेळत होता.
पाकिस्तानला चौथ्या दिवशी सामना जिंकण्यासाठी १७६ धावांची गरज होती. परंतु त्यांना १७१ धावांपर्यंतच मजल मारता आली.
८ षटके खेळूनही या दोन खेळाडूंना त्या ११ धावा करता आल्या नाही. विशेष म्हणजे यात अझर अलीला पायचीत करण्यात अजाज पटेल या न्यूझीलंडच्या गोलंदाजाला यश आले.
अजाज पटेलचा जन्म मुंबईमधील असून त्याने वयाच्या ३०व्या वर्षी कसोटीत पदार्पण केल आहे. हा त्याचा कसोटी पदार्पणाचाच सामना होता. याचवर्षी तो न्यूझीलंडकडून दोन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळला आहे.
या सामन्यात त्याने ७ विकेट्स घेतल्या.
३० वर्षांचा हा क्रिकेटर मुंबईकडून कोणताही सामना मात्र खेळला नाही. त्याचे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय कारकिर्द ही न्यूझीलंडकडून घडली आहे.
न्यूझीलंडचा हा कसोटीतील सर्वात कमी धावांनी झालेला विजय आहे. यापुर्वी त्यांनी २०११ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध ७ धावांनी विजय मिळवला होता.
तसेच कसोटी इतिहासातील हा कमी धावांनी मिळवलेला पाचवा विजय आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–नाद कॅच! ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच
–अशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल
–त्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर!
–असे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले!
–महास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र