---Advertisement---

नाद कॅच! ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच

On: सोमवार, नोव्हेंबर 19, 2018 9:45 AM
---Advertisement---

शनिवारी आॅस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या एकमेव टी२० सामन्यात आफ्रिकेने २१ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात आॅस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने केलेली अष्टपैलू कामगिरी मात्र वाया गेली.

या सामन्यात मॅक्सवेलने २ षटकांत १४ धावा देत एक विकेट घेतली. २८ चेंडूंचा सामना करताना ३८ धावा केल्या. तर २ अफलातून झेलही घेतले.

यातील सर्वात जास्त चर्चा झाली ती त्याने फाफ डुप्लेसीच्या घेतलेल्या अफलातून झेलाची. १५ चेंडूत २७ धावांवर खेळत असताना त्याने सीमारेषेवर फाफचा हा अफलातून झेल घेतला.

बिली स्टान्लेकच्या ७व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर फाफने चेंडूला सीमारेषेवर धाडले. परंतु तेथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या मॅक्सवेलने हवेत उंच उडी घेत आधी तो चेंडू सीमारेषेपार जाणार नाही याची काळजी घेतली. नंतर पुन्हा आपला पाय सीमारेषेला लागावा नाही म्हणुन चेंडू हवेत फेकत सीमारेषेआत येत झेल घेतला.

यामुळे सुरेख फलंदाजी करत असलेला फाफ डुप्लेसी लवकर बाद झाला. तरीही याचा विशेष फायदा आॅस्ट्रेलिया संघाला झाला नाही.

आॅस्ट्रेलिया दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सामना जिंकत १ सामन्याची मालिका जिंकला. १० षटकांच्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ख्रीस माॅरिसच्या २ विकेटच्या जोरावर २१ धावांनी विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या:

अशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल

त्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर!

असे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले!

महास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र

क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment