यंदाच्या वर्षात फक्त आणि फक्त कोरोना व्हायरसची चर्चा बघायला भेटली. त्याच कारणाने या काळात भारतीय संघाला खूप मोठी विश्रांती मिळाली. त्यामुळे भारतीय संघाने खूप कमी प्रमाणात सामने खेळले आहेत. यामधे भारतीय संघाने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशाविरुद्ध फक्त मालिका खेळल्या आहेत. या वर्षात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली एक ही कसोटी सामना जिंकता आला नाही.
भारतीय संघाने 2020 मध्ये मार्च महिन्यापासून नोव्हेंबर पर्यंत एकही सामना खेळला नव्हता. या वर्षात भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्ध दोन आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामधे भारतीय संघाला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला आहे.
भारतीय संघाने 2020 मध्ये विराटच्या नेतृत्वाखाली एक ही कसोटी सामना जिंकला नाही.
भारतीय संघाने 2020 मध्ये एकूण 4 कसोटी सामने खेळले. त्यापैकी 3 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीने केले होते. विराटच्या नेतृत्वाखाली खाली खेळण्यात आलेल्या एका ही सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही. यामध्ये न्यूझीलंड संघाविरुद्धच्या 2 आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 1 सामन्याचा समावेश आहे. मात्र 2020 च्या अखेरीस अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताने एक कसोटी सामना खेळला. या एकमेव कसोटी सामन्यात भारताला विजय मिळवता आला.
भारताकडून 2020 मध्ये कसोटीत अजिंक्य रहाणे एकमेव शतक करणारा खेळाडू ठरला
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळताना भारतीय संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना अजिंक्य रहाणेने 112 धावांची खेळी केली. त्यामुळे 2020 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये शतक करणारा अजिंक्य रहाणे भारताचा एकमेव खेळाडू ठरला.
कसोटी क्रिकेटमध्ये 2020 भारताकडून अजिंक्य रहाणेने केल्या सर्वाधिक धावा
भारतीय संघाकडून 2020 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा अजिंक्य रहाणे हा फलंदाज ठरला. त्याने 4 कसोटी सामन्यात 38.85 च्या सरासरीने सर्वाधिक 272 धावा काढल्या आहेत. यादरम्यान त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 112 धावांची शतकीय खेळी साकारली.
भारतीय संघाकडून चेतेश्वर पुजारा कसोटी क्रिकेटमध्ये 2020 साली सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज दुसरा खेळाडू ठरला. त्याने 4 कसोटी सामन्यात 20.37 च्या सरासरीने 163 धावा केल्या आहेत. यामधे त्याची सर्वोच्च खेळी 53 धावांची आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीचा दशकातील सर्वोत्तम टी२० संघात समावेश कसा ? ‘या’ भारतीय क्रिकेटरने उपस्थित केला प्रश्न
गुडबाय २०२० : यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे ‘हे’ आहेत टॉप ५ क्रिकेटपटू
क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी! २०२१ मध्ये टीम इंडिया खेळणार ‘एवढ्या’ मालिका