मोहाली । एकवेळ सोळा कोटी मिळालेल्या युवराजला यावेळी आयपीएलमध्ये जेमतेम २ कोटी रुपयांना किंग्ज इलेव्हन पंजाब आपल्या संघात घेतले. परंतु आपण आजही तेवढीच तुफाणी फटकेबाजी करु शकतो हे या महान खेळाडूने पुन्हा दाखवून दिले आहे.
A legend is making is way home! @YUVSTRONG12 is a lion once again as we get him for his base price of 2 crores! Welcome back home paaji! #LivePunjabiPlayPunjabi #IPLAuction
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) January 27, 2018
काल किंग्ज इलेव्हन पंजाबने जो सराव सामना खेळला त्यात युवराजने १२ षटकार खेचत १२० धावांची अफलातून खेळी केली. यावेळी त्याची अर्धांगिनी हेजल कीचही सामना पहायला आली होती.
जेव्हा हेजल कीच हा सराव सामना पहायला मैदानात आली बरोबर त्याच वेळी युवराजने षटकार खेचत मैदानात तिचे स्वागत केले. याचा विडीओ एका चाहत्याने ट्विटरवर शेअर केला आहे. त्यावर हेजल कीचने कमेंटही केली आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाब संघ आपला पहिला सामना दिल्ली डेयरडेविल्स संघासोबत ८ एप्रिल रोजी खेळेल. गेल्या मोसमात युवराज सनराइजर्स हैद्राबाद संघाकडून खेळला होता.
एका मोसमात हा खेळाडू किंग्ज इलेव्हन पंजाब खेळला होता आणि तेव्हाच या संघाचा कर्णधारही राहिला होता.
https://twitter.com/Ezhilkumaran15/status/981737998969487360