१९९२ बेन्सन आणि हेगेस विश्वचषकात पहिल्यादा क्रिकेट खेळताना खेळाडूंनी रंगीत कपड्याचा वापर केला होता. तसेच पहिल्यांदाच वनडे क्रिकेटमध्ये पांढरा चेंडू वापरण्यात आला होता. या विश्वचषकातच पहिल्यांदा डे नाइट सामने खेळवण्यात आले होते. तेव्हा पासून आयसीसीने नेहमीच वनडे क्रिकेटच्या नियमांमध्ये बद्दल केले आहेत. चला तर मग पाहुयात काय आहेत हे बद्दल !
बाउन्सर चेंडू अर्थातच उसळत्या चेंडूचे नियम !
क्रिकेटमध्ये बाउन्सर ही नेहमीच एक विवादास्पद गोष्ट राहिली आहे, कारण त्याचा वापर फक्त फलंदाजांना इजा किंवा धमकी देण्यासाठी गोलंदाज करतात असे काहींचे मत आहे. बाउन्सर ही गोष्ट पहिल्यांदा विवादात आली ती म्हणजे १९३२ च्या बॉडीलाइन मालिकापासून.
अगदी अलीकडे, ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटू फिल ह्यूजचा बाउन्सर खेळताना मृत्यू झाला आणि संपूर्ण क्रिकेट जगात निराशाची छाया पसरली आणि बाउन्सरला परवानगी द्यायची की नाही याबद्दल पुन्हा प्रश्न उपस्थित झाला.
११९२ – एकदिवसीय क्रिकेटमध्ये बाउंसर हे विश्वचषक ११९२ च्या वेळी प्रचलित झाला जेव्हा प्रति षटक एक बाउन्सरची मर्यादा घालण्यात आली.
११९४ – आयसीसीने एका षटकात २ बाउन्सरची मर्यादा वाढवली. जर दोन बाउन्सरच्या वर गोलंदाजाने बाउन्सर टाकले तर फलंदाजी करणाऱ्या संघाला दोन धावा मिळायच्या.
२००१ – आयसीसीने पुन्हा आधीचा नियम अर्थात एका षटकात एक बाउन्सरचा नियम लागू केला फक्त आता एका पेक्षा अधिक बाउन्सर टाकले असता फलंदाजी करणाऱ्या संघाला १ धावा मिळायची.
२०१२ – परत आयसीसीने या नियमात बदल केला आणि षटकात २ बाउन्सरची मुभा गोलंदाजाला दिली.
ट्रेंडिंग घडामोडी-
-बीसीसीआयमुळे या लोकांचे पगार अडकले, आता पैसे मिळवायला करताय ही कामं
-डीआरएस सिस्टीम तेव्हा असती तर भारताच्या या गोलंदाजाने घेतल्या असत्या ९०० विकेट्स