---Advertisement---

मिलरच्या किलर फलंदाजीला दुर्दैवी ब्रेक, गोलंदाजाच्या भेदक माऱ्याने १० फूट दूर उडाली दांडी

---Advertisement---

क्रिकेटमध्ये नेहमीच काही-ना-काही विक्रम किंवा असे सुंदर प्रसंग घडतात, जे सतत बघत रहावेसे वाटतात. सामना बघताना आपण मोठे षटकार, चपळ क्षेत्ररक्षण, उंचच उंच झेल पकडणे, जलद शतक किंवा अर्धशतक पाहत असतो. सध्या युएईत चालू असलेल्या पाकिस्तान सुपर लीग २०२१ च्या एका सामन्यात गोलंदाजाने फलंदाजाची अप्रतिम विकेट घेतली. त्याच्या विकेटची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.

९ जूनपासून युएईमध्ये पाकिस्तान सुपर लीगच्या उर्वरित सामन्यांना सुरुवात झाली आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये जगभरातले खेळाडू सुंदर प्रदर्शन करताना दिसत आहेत. क्रिकेटच्या या झटपट प्रकारातील शनिवारी क्वेटा ग्लेडिएटर्स और पेशावर जाल्मी यांचात झालेल्या सामन्यामध्ये हा प्रसंग पहायला मिळाला.

पहिल्या डावात फलंदाजी करायला आलेल्या पेशावर जाल्मी संघातील चौथ्या स्थानी फलंदाजी करत असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेविड मिलरने नेत्रदिपक फटकेबाजी केली. या सामन्यात त्याने ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४६ चेंडूत ७३ धावा केल्या. मिलरला रोखणे क्वेटा संघाला कठीण जात होते.

दरम्यान, वेगवान गोलंदाज खुर्रम शहजादला सोळावे षटक देण्यात आले. त्याने त्याच षटकात मिलरला असा चेंडू टाकला की, ज्याला मिलर कधीही विसरू शकणार नाही. डावखुरा फलंदाज मिलरसाठी ‘ओवर द विकेट’ गोलंदाजी करायला आलेल्या खुर्रमने आपल्या वेगवान चेंडूने यष्टी आरपार उडवून टाकली. चेंडू एवढा जोरदार होता की, यष्टी १० फूट लांब जाऊन उडाली. (bowler blew david miller stump 10 feet away, watch video)

https://twitter.com/thePSLt20/status/1403769884954202115?s=20

दक्षिण आफ्रिका संघाचे प्रतिनिधित्व करणारा मिलर याने आजवर दक्षिण आफ्रिका संघासाठी १३४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३३३१ धावा केल्या आहेत. तसेच ८१ टी-२० सामन्यात १५२५ धावा त्याने केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---