टी20 विश्वचषक 2022 सुरू होण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक राहिले आहेत. या मोठ्या स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाची खतरनाक गोलंदाजी भलतीच चर्चेत आहे. यामागील कारण आहे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ. पाकिस्तान न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात तिरंगी मालिका खेळली गेली. या तिरंगी मालिकेचा शेवटचा सामना शुक्रवारी (दि. 14 ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडला. यामध्ये पाकिस्तान संघाने 5 विकेट्सने विजय मिळवला. यावेळी गोलंदाज हॅरिस रौफ याने आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. तसेच, विरोधी संघांनाही आपल्या खास अंदाजात चेतावणी दिली.
या अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 163 धावा चोपल्या. यावेळी हॅरिस रौफ (Haris Rauf) याने आपल्या 4 षटकांमध्ये 22 धावा देत 2 मोठ्या फलंदाजांना तंबूत धाडले. यासोबतच त्याने एक चेंडू असा काही फेकला की, न्यूझीलंड संघाच्या फलंदाजाची बॅटच तुटली. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
हॅरिस रौफ याने हा खतरनाक कारनामा सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर करून दाखवला. यावेळी त्याच्या चेंडूचा वेग इतका वेगवान होता की, न्यूझीलंडचा फलंदाज ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) स्वत:चा या चेंडूविरुद्ध बचाव करण्यापासून रोखू शकला नाही. यादरम्यान चेंडू बॅटच्या खालच्या भागाला लागला आणि बॅटचे दोन तुकडे झाले. रौफच्या या चेंडूचा वेग तब्बल 143 ताशी किमी इतका होता. यादरम्यानचा व्हिडिओ पाहून पाहणाराही हैराण झाल्याशिवाय राहणार नाही.
Haris Rauf firing bullets today that was Phillips’ favourite bat apparently 😂 pic.twitter.com/8WPcVEEi1b
— adi✨ (@adidoescricket) October 14, 2022
रौफ याने ज्या 2 फलंदाजांना बाद केले, त्यामध्ये ड्वेन कॉनवे याचाही समावेश होता. कॉनवे सहाव्या षटकात रौफच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. कॉनवे या मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. कॉनवेला 14 धावांवर तंबूत धाडल्यानंतर रौफने ईश सोढी याला 2 धावांवर बाद करत पव्हेलियनमध्ये पाठवले.
पाकिस्तान संघाचा डाव
न्यूझीलंड संघाने दिलेले 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने 19.3 षटकात 5 विकेट्स गमावत 168 धावा चोपल्या आणि 5 विकेट्सने सामना जिंकला. यावेळी पाकिस्तानसाठी मोहम्मद नवाज याने नाबाद 38 धावा आणि इफ्तिखार अहमद याने नाबाद 25 धावा केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त मोहम्मद रिझवान (34), हैदर अली (31) धावांचे योगदान दिले. अशाप्रकारे पाकिस्तान संघाने तिरंगी मालिकेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. यानंतर कदाचित टी20 विश्वचषकापूर्वी तिरंगी मालिकेतील पाकिस्तानच्या विजयाने भारतीय संघाच्या चिंता वाढवल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान संघाचा टी20 विश्वचषकातील पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय भानगड! हरभजन सिंगच्या एकाच आवाजावर हादरलं पंजाब क्रिकेट असोसिएशन, अध्यक्षाने दिला राजीनामा
वनडे विश्वचषकामुळे बीसीसीआय होणार कंगाल? भारत सरकारची नीती ठरणार मारक