इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील आठव्या सामन्यात पंजाब किंग्स संघाने राजस्थान रॉयल्स संघाला आस्मान दाखवले. या सामन्यात राजस्थानला 5 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह पंजाबने सलग दुसरा सामना जिंकत गुणतालिकेत दुसरा क्रमांक पटकावला. दुसरीकडे, राजस्थान गुणतालिकेत चौथ्या स्थानी घसरला. असे असले, तरी सामन्यादरम्यान एक अशी घटना पाहायला मिळाली, ज्याने आयपीएल स्पर्धेच्या जुन्या वादाच्या आठवणी ताज्या झाल्या. चला तर त्याविषयी जाणून घेऊयात…
काय होती ती घटना?
झाले असे की, पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाच्या डावातील सातवे षटक आर अश्विन (R Ashwin) टाकत होता. अश्विन षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी येताच तो अचानक थांबला. यावेळी शिखर धवन (Shikhar Dhawan) क्रीझ सोडून पुढे गेला होता. मात्र, अश्विनने धवनला मंकडींग (Ashwin Dhawan Mankading) केले नाही. तसेच, पंजाबच्या कर्णधाराला क्रीझवर परत येण्यासाठी वेळ दिला. ही घटना घडताच कॅमेरा लगेच सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या जोस बटलर (Jos Buttler) याच्याकडे वळला.
Ashwin warns Dhawan for backing & then camera shows Buttler.pic.twitter.com/LCoS1WnCOQ
— Johns. (@CricCrazyJohns) April 5, 2023
खरं तर, बटलर आणि मंकडींग (Buttler And Mankading) यांचा खूपच घनिष्ठ संबंध आहे. आयपीएल 2019मध्ये आर अश्विन याने जोस बटलर याला मंकडींगने बाद केले होते. यामुळे बटलर आयपीएल इतिहासातील मंकडींगद्वारे बाद होणारा पहिला फलंदाज बनला होता. ही घटना त्यावेळी खूपच चर्चेत होती. तसेच, अनेकांनी अश्विनच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्न उपस्थित केले होते.
या घटनेला आता 4 वर्षे उलटली आहेत आणि रंजक बाब अशी की, अश्विन आणि बटलर हे आता एकाच संघाकडून म्हणजेच राजस्थान संघाकडून एकत्र खेळतात. जुना वाद विसरून हे दोघे खेळाडू आता चांगले मित्र बनले आहेत.
सामन्याचा आढावा
पंजाब किंग्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 विकेट्स गमावत 197 धावा केल्या होत्या. पंजाबकडून यावेळी धवन आणि प्रभसिमरन सिंग यांनी अनुक्रमे नाबाद 86 आणि 60 धावांचे योगदान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला 20 षटकात 7 विकेट्स गमावत 192 धावाच करता आल्या होत्या. यावेळी राजस्थानसाठी संजू सॅमसन याने 42, शिमरॉन हेटमायर 36 आणि ध्रुव जुरेल याने नाबाद 32 धावांचे योगदान दिले होते. पंजाबकडून गोलंदाजी करताना नेथन एलिस याने 4 षटके गोलंदाजी करताना 30 धावा खर्च करत 4 विकेट्सही घेतल्या होत्या. (bowler ravichandran ashwin warned shikhar dhawan at the non strikers end see video here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बटलरसारखा तगडा फलंदाज असतानाही अश्विन ओपनिंगला का आला? समोर आले धक्कादायक कारण
शानदार सुरुवात करणाऱ्या राजस्थानचा पंजाबविरुद्ध पराभव का झाला? संजू म्हणाला, ‘आमची लय…’