---Advertisement---

अविश्वसनीय! थेट गोलंदाजानेच १०० मीटरपर्यंत धाव घेत पकडला झेल, व्हिडिओ होतोय व्हायरल

---Advertisement---

क्रिकेट हा एक असा खेळ आहे, जिथे खेळाडू मोठ्या स्फूर्तीने आणि ताकदीने खेळताना दिसतात. कोणताही संघ सामना जिंकण्यासाठी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या क्रिकेटच्या तिन्ही विभागात उत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातही २०-२० षटकांच्या टी२० क्रिकेटमध्ये सर्वच गोष्टी वेगाने कराव्या लागतात. अशाच २०-२० षटकांच्या एका टी२० लीगमधील सामन्यात एका गोलंदाजाने अविश्वसनीय असा झेल पकडला आहे.

श्रीलंकामध्ये आर्मी कमांडर लीग चालू आहे. या लीगमधील एक सामना मंगळवारी (६ ऑक्टोबर) सुपर फॅशन नॉदर्न वॉरियर्स विरुद्ध प्राइम स्टेला इस्टर्न वॉरियर्स संघात पार पडला. हा सामना प्राइम स्टेला इस्टर्न वॉरियर्सने ९१ धावांनी जिंकला. दरम्यान प्राइम स्टेला इस्टर्न वॉरियर्सचा वेगवान गोलंदाज थेनु रतनने विरुद्ध संघातील आशन रणदिकाचा अप्रतिम झेल पकडला.

रतन डावातील ८वे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याने षटकातील दूसरा चेंडू टाकला आणि त्यावर फलंदाज रणदिकाने मिड विकेटच्या दिशेला शॉट मारण्याचा प्रयत्न केला. परंतु रतन त्याने मारलेला चेंडू पकडण्यासाठी वेगाने धावला आणि त्याने तब्बल १०० मीटरपर्यंतची धाव घेतली आणि अचूक झेल पकडला. मिड विकेटकडे एक नव्हे तर दोन क्षेत्ररक्षक उभे होते, तरीही रतनने पळत जाऊन तो चेंडू पकडला.

https://twitter.com/NewsCorpCricket/status/1314010207467438080?s=20

 

रतनचे हे कृत्य पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. ही रतनची सामन्यातील एकमेव विकेट होती. त्याने पूर्ण सामन्यात २ षटकात १२ धावा देत ती एकमेव विकेट घेतली होती.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---