fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कसोटीत या गोलंदाजाने रोहित शर्माची घेतली आहे सर्वाधिक वेळा विकेट

अॅडलेड। भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध आजपासून पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारताची सुरुवात खराब झाली आहे.

भारताचे केएल राहुल, मुरली विजय, कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हे फलंदाज 50 धावांच्या आतच बाद झाले आहेत. त्यामुळे भारताच्या डावाची जबाबदारी रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारावर आली होती.

त्यांनीही डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण पाचव्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी रचली असतानाच रोहितला नॅथन लायनने बाद केले.

रोहितने 38 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर लायनच्या गोलंदाजीवर डिप स्केअर लेगला फटका मारण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या बॅटच्या पुढच्या बाजूला चेंडू लागून उडाला. त्यावर मॅर्क्यूस हॅरिसने चूक न करता योग्य झेल घेतला.

लायनच्या गोलंदाजीवर रोहित बाद होण्याची ही चौथी वेळ होती. त्यामुळे लायन रोहितला कसोटीमध्ये सर्वाधिकवेळा बाद करणारा गोलंदाज ठरला आहे.

आत्तापर्यंत रोहित 7 वेळा आॅस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीमध्ये खेळला आहे. त्यातील चार वेळा त्याला लायननेच बाद केले आहे, तर दोन वेळा शेन वॉटसन आणि एक वेळा मिशेल जॉन्सनने त्याला बाद केले आहे.

लायनच्या पाठोपाठ रोहितला कसोटीत सर्वाधिक वेळा बाद करण्यात दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचे वर्नोन फिलँडर आणि कागिसो रबाडा हे आहेत. या दोघांनीही रोहितला कसोटीत प्रत्येकी 3 वेळा बाद केले आहे.

रोहितने या सामन्यात पहिल्या डावात 61 चेंडूत 37 धावांची खेळी केली आहे. यात त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनीमुळे मी निवृत्ती घेतलेली नाही- व्हिव्हिएस लक्ष्मण

Video: उस्मान ख्वाजाने घेतला किंग कोहलीचा अप्रतिम झेल

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: अॅडलेड कसोटीत भारताची अडखळत सुरुवात, पहिल्या सत्रातच गमावल्या चार विकेट्स

पहिला कसोटी सामना टीम इंडिया जिंकणारच, जाणुन घ्या कारण

You might also like