---Advertisement---

आयपीएलमध्ये एकाच षटकात ‘या’ दोघांनी टाकलेत १० चेंडू, एक जण आहे टी२० दिग्गज

On: शुक्रवार, मे 14, 2021 7:57 PM
---Advertisement---

आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यागणिक वेगवेगळे विक्रम होत असतात. काही विक्रम हे अगदी पहिल्या आयपीएलपासून अबाधित आहेत तर, काही विक्रम हे इतिहासजमा झाले आहेत. अनेक चांगल्या विक्रमासह बऱ्याच वेळा काही नकोसे विक्रम देखील खेळाडू करत असतात. त्याचप्रमाणे, आयपीएलमध्ये असा एक नकोसा विक्रम दोन गोलंदाजांच्या नावे जो अतिशय दुर्मिळरित्या पाहायला मिळतो. तो विक्रम म्हणजे एकाच षटकात १० चेंडू टाकण्याचा. आज आपण त्याच दोन गोलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी एकाच षटकात १० चेंडू टाकले आहेत.

१) ड्वेन ब्राव्हो –
आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील बारावा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने ४५ धावांनी विजय मिळवला. मात्र, या सामन्यात चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने एकाच षटकात १० चेंडू टाकले.

राजस्थानच्या डावातील अकरावे षटक टाकण्यासाठी ब्राव्होने चेंडू हातात घेतला. ब्राव्होने पहिला वैध चेंडू टाकण्या आधीच दोन वाईड चेंडू टाकले‌. त्यानंतर, पहिला व दुसरा चेंडू शिवम दुबेने निर्धाव खेळले. तिसऱ्या चेंडूवर दुबेने एक धाव काढली. त्यानंतर, स्ट्राइकवर आलेला जोस बटलरदेखील एक धाव काढू शकला नाही. पाचव्या चेंडूवर त्याने एक धाव घेत पुन्हा दुबेला स्ट्राईक दिली. ब्राव्होने अखेरचा चेंडू टाकण्यापूर्वी पुन्हा दोन वाईड चेंडू टाकले. अखेरच्या चेंडूवर पुन्हा एकही धाव निघाली नाही. अशाप्रकारे ब्राव्होने आपल्या एकाच षटकात १० चेंडू टाकले.

२) राहुल तेवतिया-
आयपीएल २०२० मधील ३३ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर असा खेळला गेला. विराट कोहलीच्या नेतृत्वातील आरसीबीने ७ गडी राखून हा सामना आपल्या नावे केला होता. राजस्थानचा अष्टपैलू राहुल तेवतियाने या सामन्यात एकाच षटकात १० चेंडू टाकण्याची नकोशी कामगिरी केलेली.

राहुलने आरसीबीच्या डावातील नवव्या षटकातील पहिले दोन चेंडू निर्धाव टाकले. तिसरा चेंडू नो बॉल टाकला गेला ज्यावर देवदत्त पडिक्कलने एक धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर विराट कोहलीने तर चौथ्या चेंडूवर पडिक्कलने प्रत्येकी एक धाव काढली. त्यानंतर, राहुलने सलग तीन वाईड चेंडू टाकले‌. षटकातील पाचव्या चेंडूवर एक धाव निघाली. तर, अखेरचा चेंडू विराट कोहलीने निर्धाव खेळून काढला.

महत्त्वाच्या बातम्या-

दुखापतींमुळे कारकिर्दीचे नुकसान झाले, या खेळाडूने व्यक्त केली खंत

मनोज तिवारीला मंत्रीपदाच्या शुभेच्छा देताना हरभजनने केले धक्कादायक विधान, लगेच हटवले ट्विट

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने जाहीर केली करारबद्ध खेळाडूंची यादी, या दोघांना मिळाली प्रथमच संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---