Most Times Dismissing Rohit Sharma: बॉक्सिंग डे कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. नाणेफेक गमावत भारतीय संघ फलंदाजीला उतरला. या सामन्यात सलामीला उतरलेला भारताचा कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. त्याला यजमान संघाचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याने पदार्पणवीराच्या हातून झेलबाद केले. यासह रोहित रबाडाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील गिऱ्हाईक बनला. रबाडाने रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद करण्याचा भीमपराक्रम नावावर केला.
रबाडाचा विक्रम
या सामन्यात नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) याचा हा निर्णय संघाच्या गोलंदाजांनी प्राथमिकरीत्या योग्य ठरवला. भारताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानावर उतरले होते. यावेळी डावातील पहिल्या चार षटकांचा खेळ झाल्यानंतर कागिसो रबाडा पाचवे षटक टाकण्यासाठी आला होता.
रबाडाने आपल्या षटकातील अखेरच्या चेंडूवर रोहितला पदार्पणवीर नांद्रे बर्गर (Nandre Burger) याच्या हातून झेलबाद केले. रोहित यावेळी 14 चेंडूत 1 षटकाराच्या मदतीने 5 धावा करून बाद झाला. रोहितला बाद करताच रबाडाने मोठा विक्रम नावावर केला. रबाडा रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 13 वेळा बाद करणारा गोलंदाज बनला.
रबाडाव्यतिरिक्त रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद करणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी असून त्याने 12 वेळा ही कामगिरी केली आहे. तिसऱ्या स्थानी असलेल्या श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाज अँजेलो मॅथ्यूज याने रोहितला 10 वेळा बाद केले आहे. त्यानंतर चौथ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटू नेथन लायनने 9 वेळा, तर न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 वेळा बाद केले आहे. (Bowlers who dismissed Rohit Sharma most times in international cricket Kagiso Rabada Topper In List INDvsSA 1st Test)
रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद करणारे गोलंदाज
13 वेळा- कागिसो रबाडा*
12 वेळा- टीम साऊदी
10 वेळा- अँजेलो मॅथ्यूज
9 वेळा- नेथन लायन
8 वेळा- ट्रेंट बोल्ट
पहिल्या कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर, एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, गेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
हेही वाचा-
पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया खेळाडूंच्या ख्रिसमस भेटीबद्दल माजी खेळाडूची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला, ‘सौरव गांगुली स्टीव्ह वॉसाठी असे…’
बर्गरचा कहर! 3 ओव्हरमध्ये घेतल्या दोन विकेट्स, टीम इंडिया दबावात