---Advertisement---

आला पीचवर की पाठव तंबूत, फलंदाजांना भोपळाही फोडू न देणारे ३ भेदक गोलंदाज

On: शुक्रवार, मे 1, 2020 9:02 PM
---Advertisement---

क्रिकेटमध्ये सार्वधिक वाईट गोष्ट कोणती असेल तर फलंदाजाने ० धावेवर बाद होणे. त्याला डक असेही संबोधले जाते. परंतु डक अर्थात ० धावेवर एखाद्या फलंदाजाला बाद करणे ही गोलंदाजासाठी तेवढीच आनंद देणारी गोष्ट असते.

मग जागतिक क्रिकेटमध्ये असा कोणता गोलंदाज आहे ज्याने त्याने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजाला ० धावेवर सार्वधिक वेळा बाद केले आहे? तर तो खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅकग्राथ आहे. त्याने त्याच्या ५६३ कसोटी बळी पैकी तब्बल १०४ वेळा फलंदाजाला ० धावेवर बाद केले आहे.

या १०४ मध्ये त्याने मायकल अथरटन, राहुल द्रविड, शेर्विन चॅम्पबेल आणि मेरव डिल्लन यांना प्रत्येकी ३ वेळा ० धावेवर बाद केले आहे.

या यादीत दुसऱ्या स्थानावर श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन व ऑस्ट्रेलिचा शेन वाॅर्न (Shane Warne) असून दोघांनीही कसोटीत १०२वेळा फलंदाजांना शुन्य धावेवर तंबूत पाठवले आहे. मुरलीने १३३ कसोटीत ८०० बळी घेताना १०२ खेळाडूंना थेट शुन्य धावेवर तंबूत पाठवले तर शेन वाॅर्नने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेताना १०२ फलंदाजांना भोपळाही फोडू दिला नाही.

ट्रेंडिंग घडामोडी-

-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू

-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू

-चहलने रोहितला दिल्या अशा शुभेच्छा, रितीकाही झाली नाराज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---