प्रत्येकजण नवीन वर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देत आहे. क्रीडाविश्वात आगामी वर्षात अनेक मोठ्या स्पर्धा आणि मालिका खेळला जाणार आहेत. पण सरत्या वर्षातील आठवणी इतक्या लवकर विसरता येणार नाहीत. वनडे विश्वचषकासारखी मोठी क्रिकेट स्पर्धा 2023 मध्ये खेळली गेली. कसोटी क्रिकेटच्या दृष्टीनेही मागचे संपूर्ण वर्ष महत्वाचे राहिले. कसोटी क्रिकेटमध्येही गोलंदाजांचे प्रदर्शन उल्लेखणनीय राहिले. आपण या लेखात अशाच पाच गोलंदाजांवर नजर टाकणार आहोत, ज्यांनी सरत्या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन केले.
5. मिचेल स्टार्क –
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने मागच्या वर्षात एकूण 9 कसोटी सामने खेळले. यादरम्यान वेगवान गोलंदाजला 38 विकेट्स मिळाल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे वर्षातील सर्वोत्तम प्रदर्शन 78 धावा खर्च करून 5 विकेट्स राहिले.
4. स्टुअर्ट ब्रॉड –
इंग्लंडचा हा दिग्गज वेगवान गोलंदाज जुलै 2023 मध्ये ऍशेस मालिका खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ब्रॉड इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक राहिला आहे. त्याने मागच्या वर्षी एकूण 8 सामने खेळले असून यात 38 विकेट्स घेतल्या. 51 धावा खर्च करून 5 विकेट्स हे त्याचे वर्षातील सर्वोत्तम प्रदर्शन राहिले. वर्षात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत ब्रॉड चौथ्या क्रमांकावर आहे.
3. रविचंद्रन अश्विन –
भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन () कसोटी स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जातो. अश्विनने अनेकदा कसोटी सामन्यात हे सिद्ध देखील केले आहे. सरत्या वर्षात अश्विनचे कसोटी क्रिकेटमधील प्रदर्शन समाधानकारक असून सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्यांच्या यादीत त्याचा तिसरा क्रमांक आहे. 2023 मध्ये त्याने 7 सामने खेळेल आणि यात 41 विकेट्स घेतल्या. 71 धावा खर्च करून 7 विकेट्स हे त्याचे वर्षातील सर्वोत्तम प्रदर्शन राहिले.
2. पॅट कमिन्स –
यादीत दुसरा क्रमांक ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याचा आहे. कमिन्ससाठी 2023 वर्ष सर्व कारणांनी खास ठरले. त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने सरत्या वर्षात ऍशेस मालिका जिंकली, आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर वनडे विश्वचषक देखील जिंकला. कमिन्सने वर्षात एकूण 11 कसोटी सामने खेळले आणि यात 42 विकेट्स नावावर केल्या. 91 धावा खर्च करून 6 विकेट्स हे त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन राहिले.
1. नाथन लायन –
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज नाथन लायन या यादीत पहिल्या स्थानावर आहे. लायन सरत्या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शिकार करणारा गोलंदाज ठरला. त्याने खेळलेल्या 10 कसोटी सामन्यांमध्ये 47 विकेट्स घेतल्या. 8 विकेट्स घेण्यासाठी त्याने एका डावात 64 धावा खर्च केल्या होत्या, जे त्याचे वर्षातील सर्वोत्तम प्रदर्शन देखील राहिले. (Bowlers with the most wickets in Test cricket in 2023)
महत्वाच्या बातम्या –
Happy New Year । पाच गोलंदाजांची यादी, ज्यांनी 2023 मध्ये वनडे क्रिकेट गाजवलं
आकाश चोप्राने निवडली ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’, ‘या’ चार भारतीयांना दिलं स्थान