इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League 2025) मध्ये सर्वात तरुण शतक करणारा राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) मुंबई इंडियन्सविरुद्ध 2 चेंडूत शून्य धावांवर बाद झाल्यानंतर निराश झाला असेल, परंतु संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड म्हणाले की, 14 वर्षीय या खेळाडूला परिस्थिती अधिक गुंतागुंतीची न करता त्याच्या पद्धतीने खेळण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
(28 एप्रिल) रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध 35 चेंडूत शतक ठोकून सूर्यवंशी आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला. या लीगमध्ये तो सर्वात जलद शतक ठोकणारा भारतीय खेळाडूही ठरला, परंतु गुरुवारी (1 मे) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याला धक्का बसला.
न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज बाँड म्हणाला, “त्याला त्याच्या पद्धतीने खेळण्यासाठी थोडेसे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याने आतापर्यंत 14 वर्षांचा खेळाडू म्हणून खरोखरच अद्भुत काम केले आहे.” बॉन्डने गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले, “मला वाटते की कोचिंग स्टाफने वैभवसोबत गोष्टी जास्त गुंतागुंतीच्या करण्याचा प्रयत्न केला नाही.”
तो म्हणाला, “तो शेवटचा सामना चुकला पण आम्हाला अशा तरुण खेळाडूबद्दल खरोखर घाबरायचे नाही.” बॉन्ड म्हणाला की संघाचा ‘थिंक-टँक’ तरुण फलंदाजावरील दबाव कमी करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. जेणेकरून तो भीतीशिवाय स्वतःला व्यक्त करू शकेल. तो म्हणाला, “मला माहित आहे की (सहाय्यक प्रशिक्षक) विक्रम राठोड त्याच्या खेळाच्या योजना आणि त्याला सामोरे जाणाऱ्या गोलंदाजांबद्दल बोलतील. तो या सामन्यासाठी पुन्हा असे करेल. तो अजूनही खूप तरुण खेळाडू आहे, म्हणून त्याला तिथे जाऊन मोठे फटके मारताना पाहून मला आनंद होत आहे.”






