विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा पुढील सामना भारताशी होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून सर्वांच्या नजरा त्याकडे लागल्या आहेत. त्याचवेळी, या सामन्यापूर्वी आकाश चोप्राची प्रतिक्रिया आली आहे, त्यानी पाकिस्तानी गोलंदाजी पूर्वीपेक्षा कमकुवत असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानने २०२३ विश्वचषकात आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून त्यांच्या खात्यात दोन विजय आहेत. यामध्ये संघाच्या फलंदाजांचे योगदान अधिक आहे, कारण गोलंदाजांनी भरपूर धावा दिल्या आहेत, आणि विरोधी संघांना रोखण्यात त्यांना अपयश आले आहे.
मागील सामन्यात श्रीलंकेने त्यांच्याविरुद्ध ३४४ धावा केल्या होत्या. मात्र, पाकिस्तानने विश्वचषकात सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम नोंदवला आणि 10 चेंडू शिल्लक असताना 6 विकेट्सने दणदणीत विजय नोंदवला. बाबर आझमच्या सर्व प्रमुख गोलंदाजांनी ५० हून अधिक धावा दिल्या होत्या. त्यांचा स्ट्राइक बॉलर शाहीन आफ्रिदीने 9 षटकात फक्त एक विकेट्स घेत 66 धावा दिल्या होत्या.
आकाश चोप्राने त्याच्या यू-ट्यूब चॅनलवर पाकिस्तानी गोलंदाजीबद्दल आपले मत मांडले. तो म्हणाला, “पाकिस्तानी संघ आणि त्यांच्या स्टाफच्या चेहऱ्यांवर इतका विश्वास तुम्हाला दिसत नाही. त्यांना विश्वास नाही की ते जिंकतील, कारण बर्याच गोष्टी बदलत आहेत. पाकिस्तानची ताकद ही गोलंदाजी आहे, जी आता त्यांची कमजोरी बनली आहे. असे बोलले जात आहे की, शाहीन शाह आफ्रिदीच्या बोटाला सूज आली आहे, ज्यामुळे तो चेंडू नीट पकडू शकत नाही. हसन अली चांगली कामगिरी करत आहे, पण तो चांगली कामगिरी करत राहील की नाही हे आपल्याला माहीत नाही. हारिस रौफ कडेही लय दिसत आहे. शादाब खानला योग्य ठिकाणी चेंडू टाकता येत नाही. मोहम्मद नवाज अगदी सामान्य दिसत आहे. मला माहित नाही की ते उसमा मीरला खेळायला संधी देतील की नाही.” (Pakistan bowling has now become their weakness the veteran big statement before the match against India)
महत्वाच्या बातम्या –
BAN vs NZ । बोल्टपुढे ब्रेट ली पडला फिका! वनडेत 200 विकेट्स घेत नावावर केला नवा विक्रम
आयसीसीचा ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर, भारताच्या युवा खेळाडूने मारली बाजी