बॉक्सिंग डे कसोटीसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ आमने सामने आहेत. मंगळवारी (26 डिसेंबर) हा सामना सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट्स पार्टमध्ये सुरू होईल. भारतीय संघाला नाणेफेक गमावल्यानंतर या सामन्यात प्रथम फलंदाजी करावी लागली. पहिल्या तीन विकेट्स स्वस्तात गमावणाऱ्या भारतासाठी विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी महत्वाच्या धावा केल्या. सोबतच विराटच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झाली.
भारतीय संघासाठी बॉक्सिंग डे कसोटीची सुरुवात अपेक्षित पद्धतीने झाली नाही. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताने अवघ्या 24 धावांवर सुरुवातीच्या तीन विकेट्स गमावल्या. यात कर्णधार रोहित शर्मा (5), यशस्वी जयस्वाल (17) आणि शुबमन गिल (2) या तीन प्रमुख फलंदाजांचा समावेश होता. पहिल्या तीन विकेट्स स्वस्तात गमावल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि श्रेयस अय्यर (31) यांच्यात 68 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर अय्यरच्या रुपात भारताला चौथा झटका बसला. तर विराटने देखील वैयक्तिक 38 धावा करून विकेट गमावली. असे असले तरी, विराटने या खेळीच्या जोरावर एका मोठा विक्रम नावावर केला.
उभय संघांतील ही कसोटी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे. विराटने केलेल्या 38 धावांच्या मदतीने भारतीय दिग्गज कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. मंगळवारी विकेट गमावल्यानंतर त्याच्या नावावर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 2101 धावांची नोंद झाली आहे. त्याने कर्णधार रोहित शर्मा याचा विक्रम मोडीत काढला. सध्या रोहित या यादीत 2097 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. (Boxing Day Test ; Virat Kohli becomes the leading run scorer for India in the WTC)
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
2101 – विराट कोहली (35 सामने, 57 डाव)
2097 – रोहित शर्मा (26 सामने, 42 डाव)
1769 – चेतेश्वर पुजारा (35 सामने, 62 डाव)
पहिल्या कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर, एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, गेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
महत्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिकेची वाढली चिंता, कर्णधार टेम्बा बावुमा मैदानातून बाहेर, जाणून घ्या कारण
पहिल्या कसोटीत जडेजा का खेळत नाहीये? BCCI आणि रोहित, दोघांनी सांगितलं मोठं कारण; घ्या जाणून