मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सोशल मिडीयावर सतत सक्रिय असतो. तो जगात काही खास दिसेल ते आपल्या सोशल मिडीया आकाऊंटवरुन शेअर करत आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असतो. तसेच त्यावर तो त्याचे मत सुद्धा मांडत असतो. नुकताच भारताच्या माजी कर्णधाराने आपल्या ट्वीटर आकाऊंटवरुन मुंबईच्या एका क्रिकेट क्लबचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मुले आणि मुली एकसाथ क्रिकेट खेळताना दिसत आहेत.
तेंडूलकरला हे खुप आवडले आहे. त्याने समानतेसाठी खेळ हा उत्तम सहाय्यक असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये तेंडूलकरने लिहले की, ‘हे पाहून खूप छान वाटले की, मुले आणि मुली एक साथ क्रिकेट खेळत आहेत. खेळ समानतेसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करतो. हे मुंबईच्या एमआयजी क्लबमधील आहे. खूप शानदार.’ सचिनने शेअर केलेल्या या व्हिडिओला चाहत्यांनी सुद्धा चांगल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.
Wonderful to see girls & boys play a cricket match together. Sport can be a great enabler for equality.
Saw this recently in MIG Club Mumbai. Well done!#CricketTwitter pic.twitter.com/iEAoCn3PV7
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 25, 2022
सचिन तेंडूलकर सध्या मुंबई इंडियन्स संघासोबत बायोबबलमध्ये आहे. तो मुंबई संघाचा मेंटाॅर आहे आणि तो हा संपूर्ण हंगाम संघासोबत असणार असून खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहे. आयपीएलची सुरुवात शनिवार (२६मार्च) पासून होणार असून पहिला सामना कोलकाता आणि चेन्नई संघांमध्ये खेळला जाणार आहे. मुंबई संघ पहिला सामना २७ मार्चला दिल्ली संघासोबत खेळणार आहे. मुंबई संघाने ५ वेळा आयपीएलची ट्राॅफी जिंकलाी आहे. मुंबईसाठी मागचा हंगाम खूप निराशाजनक होता. यावर्षी आयपीएलमध्ये १० संघ खेळणार आहेत, त्यामुळे यावर्षीच्या हंगाम रोमांचक असेल, असे अनेकांनी अंदाज वर्तवले आहे.
मुंबई इंडियन्स संघ-
रोहित शर्मा( कर्णधार), जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, बेसिल थंपी, मुरुगन अश्विन, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडे, एन तिलक वर्मा, संजय यादव, जोफ्रा आर्चर, डॅनियल सॅम्स, टायमल मिल्स, टिम डेविड, राइली मेरेडिथ, मोहम्मद अरशद खान, अनमोलप्रीत सिंह, रमनदीप सिंह, राहुल बुद्धी, हृतिक शॅाकीन, अर्जुन तेंडुलकर, फेबियन ऍलेन आणि आर्यन जुयाल.
महत्त्वाच्या बातम्या-
गेल्या ४ वर्षांपासून आयपीएलमध्ये ‘या’ कारणामुळे होत नाहीये ओपनिंग सेरेमनी, वाचा सविस्तर
‘जॉब डन’ म्हणत जेव्हा धोनीने २०२१मध्येच दिले होते सीएसकेचे नेतृत्त्व सोडण्याचे संकेत, पाहा Video
पुढचा विराट म्हटला गेलेला उन्मुक्त चंद अचानक गायब कसा झाला?