नुकत्याच प्रदर्शित झालेला तेलगु चित्रपट ‘पुष्पा’ची जादू संपुर्ण जगभरात पसरली आहे. या चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर अनेकजण व्हिडीओ बनवत आहेत. कलाकारांबरोबरच आता क्रिकेटपटू सुद्धा यात मागे राहिले नाहीत. ऑस्ट्रेलियन सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर, अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो, भारतीय स्टार फलंदाज सुरेश रैना आणि हार्दिक पांड्या यांनी सुद्धा या गाण्यावर डान्स केला आहे. तसेच बाकी खेळाडू देखील चित्रपटातील डायलाॅग्सवर व्हिडीओ बनवत आहेत.
बांग्लादेशचा क्रिकेट संघाचा अष्टपैलू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) या खेळाडूचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो क्रिकेटच्या मैदानातच ‘श्रीवल्ली हुक स्टेप‘ (Srivalli Hook Step) करताना दिसत आहे.
व्हिडिओ पाहा- आणि विराट कोहलीला धरावे लागले सचिनचे पाय
बांग्लादेश प्रीमियर लीगचा ८ वा सामना २५ जानेवारी रोजी कोमिल्ला व्हिक्टोरियन्स आणि फॉर्च्यून बारिशल या दोन संघांमध्ये मीरपूरच्या शेर-ए-बांगला या स्टेडियमवर खेळला गेला. बीपीएलच्या या सामन्यात इमरुल कायसच्या नेतृत्वाखाली कोमिल्ला व्हिक्टोरियन्स संघाने फॉर्च्यून बारिशलवर ६३ धावांनी विजय मिळवला. या सामन्यादरम्यान फॉर्च्यून बारिशल संघाचा कर्णधार शाकिब अल हसन आणि कॅरेबियन खेळाडू ड्वेन ब्राव्हो यांनी मैदानात आपल्या मस्त शैलीने लोकांचे मनोरंजन केले.
शाकिब अल हसनने या सामन्यात विरुद्ध संघातील खेळाडूची विकेट घेतल्यानंतर पुष्पा चित्रपटातील एक स्टेप केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या झियाउर रहमानने डू प्लेसिसचा झेल घेतला. नंतर शाकिब अल हसनने चेहऱ्याजवळ हात घेऊन ‘श्रीवल्ली हुक स्टेप’ करायला सुरुवात केली.
After Nazmul Islam, then @DJBravo47, and now the Bangladeshi 🐐 @Sah75official displaying the #Pushpa move! 🥳
The @alluarjun movie has really taken over the #BBPL2022. 🔥
📺 Catch these antics for just ₹5, LIVE on #FanCode 👉 https://t.co/lr5xUr0sLW#BPLonFanCode #alluarjun pic.twitter.com/9TAn8xqksr
— FanCode (@FanCode) January 26, 2022
दरम्यान याचं सामन्यात फॉर्च्यून बारिशलच्या ड्वेन ब्राव्होनेही पुष्पाच्या श्रीवल्ली गाण्यावर अल्लू अर्जुनप्रमाणे चालत डान्स केला आहे. या नृत्याला ‘पुष्पा वॉक’ असे नाव देण्यात आले आहे. भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि खलील अहमद यांनीही त्यांचा ‘पुष्पा वॉक’ करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
या सामन्यात हसनने आपल्या संघासाठी चार षटके टाकत २५ धावा देऊन दोन बळी घेतले. परंतु फलंदाजीत त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. त्याने संघासाठी ४ चेंडूत फक्त १ धाव काढू शकला. या सामन्यात ब्राव्होने तीन आणि शकिबने दोन गडी बाद केले, ज्याच्या बळावर फॉर्च्युन बरीशालने व्हिक्टोरियन संघाला २० षटकात सात गडी गमावून १५८ धावांवर रोखले. लक्ष्याचा पाठलाग करताना फॉर्च्युन बरीशालचा संघ ९५ धावांवर थांबला आणि फॉर्च्युन बरीशाल हा सामना ६३ धावांनी पराभूत झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटचं मन वळविण्याचा प्रयत्न सुरू, आयपीएल २०२२ मध्ये पुन्हा स्विकारू शकतो आरसीबीचे नेतृत्त्व
हेही पाहा-