---Advertisement---

भारतीय संघात हुड्डाची निवड आणि कृणालचे लागोपाठ १० ट्वीट्स; चाहते म्हणे, ‘त्याच्या निवडीमुळं डोकं फिरलं’

On: गुरूवार, जानेवारी 27, 2022 6:08 PM
Deepak-Hooda-and-Krunal Pandya
---Advertisement---

बीसीसीआयने बुधवारी (२६ जानेवारी) रात्री वेस्ट इंडीजविरुद्ध मायदेशातील टी-२० आणि एकदिवसीय (ind vs wi t20 & odi series) मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. आगामी मालिकेसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजस्थान संघासोबत जोडल्या गेलेल्या दीपक हुड्डा (deepak hooda) याचेही नाव आहे. हुड्डाला संघात संधी मिळाल्यानंतर चाहत्यांसोबत क्रिकेटमधील जाणकारांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. परंतु दुसरीकडे हुड्डाला संघात सामील केल्यामुळे भारतीय अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या (Krunal Pandya) ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

मागच्या वर्षी दीपक हुड्डाने एका वादानंतर अचानक देशांतर्गत क्रिकेटमधील बडौदा संघाची साथ सोडली होती. हुड्डा २०१३ पासून या संघासोबत देशांतर्गत क्रिकेट खेळत होता. बडोदा संघाची साथ सोडताना हुड्डाने सांगितल्याप्राणे कर्णधार कृणाल पांड्याने त्याच्यासोबत गैरवर्तन केले होते. याच पार्श्वभूमीवर कृणाल आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. हुड्डाची संघात निवड झाल्यानंतर कृणालच्या ट्वीटर खात्यावरून एकापाठोपाठ १० ट्वीट केले गेले, ज्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली आहे.

व्हिडिओ पाहा- आणि विराट कोहलीला धरावे लागले सचिनचे पाय ।

कृणालच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून लागोपाठ १० ट्वीट केले गेल्यानंतर ट्रोलर्सने त्याला ट्रोल करत म्हटले की, दीपक हुड्डाला संधी मिळाल्यामुळे कृणालचे डोके फिरले आहे. तर काही चाहत्यांनी असाही अंदाज व्यक्त केला आहे की, कृणालचे ट्वीटर खाते हॅक झाले आहे, कारण ट्वीटर खात्यावरून केल्या गेलेल्या १० ट्वीट्समध्ये बिटकॉइंन्सचा देखील उल्लेख केला गेला आहे. अशात खाते हॅक झाल्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. असे असले तरी, कृणालकडून यासंदर्भात कसलीही माहिती अद्याप दिली गेलेली नाहीय. याच कारणास्तव ट्रोलर्सला कृणालला ट्रोल करण्यासाठी भांडवल मिळाले आहे.

काय आहे कृणाल पांड्या आणि दीपक हुड्डाचा वाद ?
दरम्यान, दीपक हुड्डाने २०१४ मध्ये देशांदर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो स्नेहल पारिखनंतरचा दुसरा खेळाडू ठरला होता, ज्याने बडौदा संघासाठी पदार्पण सामन्यात शतक केले होते. परंतु मागच्या वर्षी त्याने बडौदा संघाची अचानकपणे साथ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्याने संघाचा कर्णधार कृणाल पांड्यावर काही गंभीर आरोप केले होते. त्याने सांगितल्याप्रमाणे कृणाल पांड्या सतत त्याच्यासोबत शिवीगाळ करत असायचा आणि त्याला कारकीर्द संपवण्याची धमकीही दिली होती.

या आरोपांसह हुड्डाने बडौदा संघ सोडला आणि राजस्थान संघात सामील झाला. मागच्या वर्षी पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत हुड्डा राजस्थान संघासाठी खेळताना दिसला होता. या स्पर्धेत त्याने ६ सामन्यात ७३.५० च्या सरासरीने २९४ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ४ अर्धशतकांचा समावेश होता आणि स्ट्राइक रेट १६८ चा होता. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीत त्याने ६ सामन्यांमध्ये १ शतक आणि १ अर्धशतकाच्या मदतीने १९८ धावा केल्या. सोबतच एक विकेटही घेतली. या प्रदर्शनाच्या जोरावर तो सध्या भारतीय संघात पुनरागमन करताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या –

बुमराह अन् शमी संघाबाहेर तरीही भारतीय स्पीडगन आहे मजबूत, ‘हे’ धुरंदर उडवणार विंडीज फलंदाजांची दाणादाण

ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते माजी हॉकी कर्णधार आणि पद्मश्री सन्मानित चरणजीत सिंग कालवश

बिश्नोईकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा, तर हुड्डाच्या निवडीने आश्चर्य; टीम इंडियाच्या निवडीसाठी चाहत्यांच्या आल्या प्रतिक्रीया

व्हिडिओ पाहा –

आणि विराट कोहलीला धरावे लागले सचिनचे पाय । Virat Touched Sachin's Feet

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---