---Advertisement---

भर मैदानात मारण्याची दिली धमकी, ब्रॅड हॅडिनचा वेस्ट इंडिजच्या ‘या’ खेळाडूबद्दल खुलासा

On: सोमवार, डिसेंबर 5, 2022 8:04 PM
West Indies team
---Advertisement---

क्रिकेेटच्या मैदानात स्लेजिंग नेहमी होत असते आणि जर सामना ऑस्ट्रेलिया संघाचा असेल तर स्लेजिंग वारंवार होण्याची खात्री असते. कधी कधी स्लेजिंगग करताना मर्यादा सोडल्या जातात. असेच काहीसे ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात पर्थ येथे खेळल्या गेेलेल्या कसोटी सामन्यात बघायला मिळाले. 2009-10 मध्ये वेस्ट इंडिज संघ ऑस्ट्रेलियाा दौऱ्यावर होता. या दौऱ्यावर पर्थमध्ये खेळलेल्या सामन्यात ब्रॅड हडिन- मिचेल जॉनसन यांचे भांडण वेेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुलेमान बेन याच्या सोबत झाले.ब्रॅड हॅडिन याने तब्बल 12वर्षांनंतर या गोष्टीचा खुलासा केला की त्यावेळी सुलेमान बेन नक्की काय बोलला होता. हॅडीन यांनी खुलासा केेला की बेन याने त्यांना चाकू मारण्याची धमकी दिली होती.

ऑस्ट्रेलिया आणि वेेस्ट इंंडिज या संघात पर्थ येथे सुरु असलेल्या सामन्यात ब्रॅड हॅडिन (Brad Haddin) समालोचन करत होते. समालोचन करताना त्यांनी सांगितले की,”बेन आम्हाला स्लेज करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला आमच्याकडून काहीही ऐकण्याची तयारी नव्हती. जी की चांगली गोष्ट नव्हती. मात्र बेन पुन्हा काहीतरी विचित्र बोलला. बेन म्हटला की तुम्ही दोघे बार्बाडोसमधून जिवंत निघू शकणार नाही. मी तुम्हाला चाकूने भोकसेन”

सुलेेमान बेन आणि मिचेल जॉनसन यांच्यात झालेली धडक
वेस्ट इंडिडजचा फिरकीपटू सुलेेमान बेन (Sulieman Benn) आणि नॉन स्ट्राईक वर उभ्या असलेल्या मिचेल जॉनसन (Mitchell Johnson) यांच्यात धडक झाली. या धडकेनंतर त्यांच्यात वाद सुरु झाला. यानंतर ब्रॅड हॅडिन बेनला काहीतरी सांगताना दिसले. त्यानंतर बेनने त्यांना चाकू मारण्याची धमकी देेऊन टाकली. ब्रॅडने याविषयी सांगताना म्हणाला की,”जेव्हा सुलेमानने चाकू मारण्याची धमकी दिली, तेव्हा मी त्याची माफी मागितली आणि तो लगेच शांत झाला. त्याने मला विचारले की तु तुझ्या साथीदाराची बाजू का घेत आहेस. त्यानंतर मी म्हणालो की आता वादाला सुरुवात झाली आहे. तु अशा प्रकारे बोलु शकत नाहीस. ”

या घटनेनंतर हॅडिन आणि जॉनसन यांच्यावर सामनाधिकाऱ्यांनी सामना शुल्काच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आलेला तर सुलेमान बेन याच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आलेली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धा| डेक्कन जिमखानाचे युनायटेड स्पोर्ट्स क्लबपुढे मोठे आव्हान
दिवंगत वॉर्नला मिळाला मानाचा पुरस्कार! क्रीडाक्षेत्रातील दिग्गजांच्या यादीत झाला समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---