भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्याची तयारी करत आहे. भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये झालेली शेवटची कसोटी मालिका कोरोनाच्या कारणास्तव रद्द करण्यात आली होती. त्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना १ जुलै ते ५ जुलै दररम्यान खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतासाठी फलंदाज चेतेश्वर पुजारा पुनरागमन करणार आहे. मात्र, भारताचा दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणेला संघात पुनरागमन करण्याची संधी मिळालेली नाही. हैमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे अजिंक्य रहाणे संघात स्थान मिळवू शकला नाही.
दुखापतीमुळे अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आयपीएल २०२२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून (Kolkata Knight Riders) काही सामने खेळू शकला नव्हता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून तो संघाबाहेर आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज ईशांत शर्माचाही (Ishant Sharma) इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने (Brad Hodge) याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर बोलताना हॉग म्हणाला की, “मला वाटते की निवडकर्त्यांनी रहाणे आणि इशांतला कसोटी संघातून बाहेर ठेवले हे खूप चांगले आहे. निवडकर्त्यांनी आता युवा खेळाडूंना कसोटीत अधिक संधी द्याव्यला हवी. हे दोघे बऱ्याच काळापासून चांगला खेळ दाखवण्यास अयशस्वी ठरलेले आहेत. तुम्हाला संघात तरुणांना आणण्याची गरज आहे जेणेकरून त्यांना आधीच अनुभवी लोकांचा अनुभव घेता येईल.”
दरम्यान, रहाणेने यंदाच्या आयपीएल हंगामात ७ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १९च्या सरासरी आणि १०३.९०च्या स्ट्राईकरेटने १३३ धावा केल्या आहेत. त्यानंतर त्याला झालेल्या दुखापतीमुळए त्याला आयपीएल मधील इतर सामने खेळता आल्या नाहीत. मात्र, रहाणेला त्याने खेळलेल्या ७ सामन्यांत देखील कोणतीही विशेष खेळी करता आलेली नाही. त्यामुळे सध्या रहाणे खराब फॉर्मशी झुंजत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
टी२० विश्वचषकात कोणता खेळाडू घेईल धोनीची जागा, शास्त्रींनी घेतले ‘या’ खेळाडूचे नाव
आरसीबीने नाही दिला चान्स, पण इंग्लंडच्या टी२० लीगमध्ये गाजलाय ‘हा’ खेळाडू
टी२० विश्वचषकात कोणता खेळाडू घेईल धोनीची जागा, शास्त्रींनी घेतले ‘या’ खेळाडूचे नाव