ऑस्ट्रेलिया संघाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने त्याचा सध्याच्या काळातील विश्व एकादश कसोटी संघ तयार केला आहे. त्याने हा संघ खेळाडूंच्या सध्याच्या फॉर्मवर आधारीत निवडला आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होणाऱ्या विराट कोहलीला त्याच्या या संघात स्थान मिळालेले नाही.
त्याच्या संघात चार भारतीय आणि चार ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश आहे. तसेच पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे.
हॉगने विराटला न घेण्यामागील कारण सांगितले आहे की ‘सर्वजण विचारतील की या संघात विराट नाही. पण जर तूम्ही त्याचे मागील १५ कसोटी डाव पाहिले तर त्याने केवळ ४ वेळा ३१ धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याचमुळे माझ्या यावर्षीच्या कसोटी संघात विराटचा समावेश नाही.’
हॉगने त्याच्या संघात मयंक अगरवाल आणि रोहित शर्माला सलामीवीर म्हणून संधी दिली आहे. त्याने याबद्दल सांगितले की ‘मयंक ज्याप्रकारे कव्हर ड्राईव्ह आणि पुल शॉट खेळतो ते आवडते. त्याच्यात सातत्य आहे.’
‘रोहित थोडा भाग्यशाली राहिला की त्याला या संघात संधी मिळाली. त्याची सरासरीने ९० च्या वर आहे. पण तो कसोटी क्रिकेट केवळ भारतात खेळला आहे. पण मला तो ज्याप्रकारे आरामात खेळतो ते आवडते.’
त्याचबरोबर हॉगने तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी ऑस्ट्रेलियाच्या मार्नल लॅब्यूशाने आणि स्टिव्ह स्मिथची निवड केली आहे. तर ५ व्या क्रमांकासाठी पाकिस्तानच्या बाबर आझमला स्थान दिले आहे. त्याने आझमला ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या शतकामुळे प्रभावित झाल्याने संधी दिली आहे. त्याने म्हटले आहे की परदेशी खेळाडूला कठिण खेळपट्टीवर खेळणे सोपे नसते पण आझमने चांगली खेळी केली होती.
हॉगच्या या वर्तमानातील विश्व कसोटी एकादश संघात सहाव्या क्रमांकावर भारताच्या अजिंक्य रहाणेला स्थान मिळाले आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटॉन डिकॉककडे हॉगने या संघाच्या नेतृत्वाची आणि यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सोपवली आहे.
तसेच हॉगने ३ वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे. यात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स, भारताच्या मोहम्मद शमी आणि न्यूझीलंडच्या नील वॅगनरचा समावेश आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनची फिरकीपटू म्हणून या संघात निवड झाली आहे.
याबरोबरच हॉगने ६ अशा खेळाडूंची नावेही सांगितली आहेत, ज्यांना अगदी थोड्या फरकासाठी त्याच्या संघात स्थाम मिळवता आले नाही. यात न्यूझीलंडच्या टॉम लॅथम, इंग्लंडच्या रॉरी बर्न्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि बेन स्टोक्स, ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर आणि भारताच्या इशांत शर्माचा समावेश आहे.
असा आहे ब्रॅड हॉगचा सध्याच्या काळातील विश्व एकादश कसोटी संघ –
मयंक अगरवाल, रोहित शर्मा, मार्नस लब्यूशाने, स्टीव्ह स्मिथ, बाबर आजम, अजिंक्य रहाणे, क्विंटन डी कॉक (कर्णधार/यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मोहम्मद शामी, नील वॅगनर, नॅथन लायन.
ट्रेंडिंग घडामोडी –
…म्हणूनच चाहते महत्त्वाचे आहेत – रोहित शर्मा
मैदानावर पाय ठेवण्यापुर्वी या ४ गोष्टी हिटमॅन करतो म्हणजे करतोच