आयपीएल २०२२ (IPL 2022) पूर्वी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने विकत घेतलेला इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय (Jason Roy) याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याने माघार घेतल्याने गुजरात संघाला मोठा तोटा होणार असल्याचे म्हटले जातेय. मात्र, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू ब्रॅड हॉग (Brad Hogg) यांनी या उलट प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले हॉग?
जेसन रॉय याने आयपीएलमधून आपले नाव मागे घेतले असले तरी, त्यामुळे गुजरात संघाला काहीही फरक पडणार नसल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू ब्रॅड हॉग याने व्यक्त केले आहे. तो ट्विट करत म्हणाला,
‘जेसन रॉयच्या जाण्याने गुजरात टायटन्स संघाला तितकासा फरक पडणार नाही. कारण, त्यांच्याकडे पर्याय म्हणून मॅथ्यू वेड उपलब्ध आहे. तसेच इतर विदेशी खेळाडू त्यांच्यासाठी उपयुक्त कामगिरी करतील.’
इंग्लंडचा मर्यादित षटकांच्या संघातील प्रमुख सलामीवीर असलेल्या जेसन रॉयवर मेगा लिलावात प्रथमच आयपीएलमध्ये सामील होत असलेल्या गुजरात टायटन्स संघाने दोन कोटी रुपयांची बोली लावली होती. तो शुबमन गिलसह संघासाठी डावाची सुरुवात करेल, असेही सांगण्यात आले होते. मात्र, रॉयने २८ फेब्रुवारी रोजी त्याने आपण या हंगामात खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. रॉय हा अधिक दिवस बायो-बबलमध्ये राहण्यासाठी उत्सुक नाही. याच कारणामुळे त्याने स्पर्धेतून नाव मागे घेतले आहे. गुजरात टायटन्सने अद्याप त्याच्याजागी कोणत्याही खेळाडूची घोषणा केली नाही.
दुसऱ्यांदा घेतला असा निर्णय
रॉय याने लिलावात निवड झाल्यानंतरही स्पर्धा न खेळण्याचा हा निर्णय दुसऱ्यांना घेतला आहे. यापूर्वी २०२० आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने दिड कोटी रुपयांमध्ये त्याला खरेदी केले होते. मात्र, त्याने असेच स्पर्धा सुरू होण्यापूर्वी खेळण्यासाठी नकार दिला होता. विशेष म्हणजे रॉय नुकत्याच संपलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये शानदार फॉर्ममध्ये दिसला होता.
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग.! ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याचे निधन, क्रिकेटविश्व हादरले (mahasports.in)