यंदाचा टी20 विश्वचषक (T20 World Cup) अमेरिका आणि वेस्ट इंडीज या दोन देशांमध्ये खेळला जाणार आहे. आगामी टी20 विश्वचषकाची सुरुवात 2 जूनपासून होणार आहे. तत्त्पूर्वी माजी क्रिकेट खेळाडूंच्या चर्चा सुरु झाल्या आहेत की, कोणते संघ या टी20 विश्वचषकात बाजी मारतील? त्यामध्ये माजी वेस्ट इंडीज कर्णधार ब्रायन लारानं (Brian Lara) स्टार स्पोर्ट्सवर 10 क्रिकेट विशेष तज्ञांसोबत भविष्यवाणी केली की, कोणते चार संघ सेमीफायनलसाठी पात्र राहतील?
ब्रायन लारानं (Brian Lara) सेमीफायनलसाठी चार संघ निवडले आहेत. त्यामध्ये भारत, अफगानिस्तान, टी20 विश्वचषक 2022 विजेता संघ इग्लंड आणि वेस्ट इंडीज या संघांचा समावेश आहे. वेस्ट इंडीजच्या संघात यंदा आंद्रे रसल, शिमरन हेटमायर, रोवमन पाॅवेल, निकोलस पूरन या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे वेस्ट इंडीजचा संघ यंदाच्या टी20 विश्वचषकात मजबूत दिसत आहे. परंतू लारानं अफगानिस्तान संघाची निवड केल्यामुळे सर्वांना विचार करण्यासाठी भाग पाडलं आहे.
आयसीसी टी20 आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये अफगानिस्तान संघ 217 रेटिंगसह दहाव्या स्थानावर आहे. अफगानिस्तान संघापेक्षा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, पाकिस्तान हे मजबूत संघ आहेत. जे टी20 विश्वचषकसुद्ध जिंकू शकतात. परंतू ब्रायन लारानं भविष्यवाणी करताना अफगानिस्तान संघाचं नाव घेतल्यानं क्रिकेट प्रेमी थोडे थक्क झाले.
ब्रायन लारानं निवडलेल्या संघांच्या प्लेइंग 11
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे, संजू सॅमसन, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू: शुबमन गिल, रिंकू सिंह, आवेश खान आणि खलील अहमद.
अफगानिस्तान- राशिद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झादरान, अझमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झादरान, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नाईब, करीम जनत, नांग्याल खरोती, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी, फरीद अहमद मलिक.
राखीव खेळाडू: सेदिक अटल, हाझरतुल्ला झझई, सलीम साफी
इंग्लंड– जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जोनाथन बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिविंगस्टन, आदिल राशीद, फिल सॉल्ट, रीस टोपले, मार्क वुड
वेस्ट इंडीज- रोवमन पॉवेल (कर्णधार), अल्झारी जोसेफ, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकेल होसेन, शमर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमरियो शेफर्ड.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! प्रज्ञानानंदाने रचला इतिहास मॅग्नस कार्लसनचा केला नाॅर्वे बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेमध्ये प्रथमच पराभव
आयसीसी टी20 रँकिंगच्या शीर्ष स्थानी आहे ‘हा’ संघ जाणून घ्या कोणत्या संघाचे वर्चस्व
‘विराट कोहली-यशस्वी जयस्वाल’ सलामी मोर्चा सांभाळावा रोहित चाैथ्या क्रमांकावर फीट विश्वचषकापूर्वी ‘या’ दिग्गजाने दिला सल्ला