वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड (WI vs ENG) यांच्यात बार्बाडोस येथे कसोटी मालिकेतील दुसरा सामना (Second Test) झाला. हा सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात वेस्ट इंडिजपुढे विजयासाठी २८२ धावांचे मोठे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ एकवेळ ४ बाद ८९ धावा अशा स्थितीत होता. मात्र पुढे कर्णधार क्रेग ब्रेथवेट (Kraigg Brathwaite) याने संघाचा पराभव टाळण्यास हातभार लावला. त्याने तब्बल १६ तास फलंदाजी करत सामना अनिर्णीत राखण्यात बहुमूल्य योगदान दिले.
या सामन्यात यजमान इंग्लंडने वेस्ट इंडिजपुढे २८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या डावात १२ तास अर्थात ७२० मिनिटे फलंदाजी करणाऱ्या ब्रेथवेटने दुसऱ्या डावात इंग्लंडच्या संघाला खूप त्रास दिला. त्याने १८४ चेंडूंचा सामना करताना नाबाद ५६ धावांची खेळी खेळली. यावेळी तो ४ तास मैदानावर चिवट झुंज देत होता.
तत्पूर्वी पहिल्या डावातही त्याने ४८९ चेंडूंचा सामना करताना १६० धावांची मॅरेथॉन खेळी केली होती. यावेळी तो जवळपास ७१० मिनिटे मैदानावर होता.
ब्रायन लाराचा १८ वर्षे जुना विक्रम मोडित
अशाप्रकारे दोन्ही डावात ६७३ चेंडू खेळत ब्रेथवेटने वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज ब्रायन लारा (Brian Lara) याचा १८ वर्षे जुना विक्रम मोडला आहे. ब्रेथवेट वेस्ट इंडिजकडून कसोटी सामन्यात सर्वाधिक चेंडू खेळणारा (Most Balls Faced) फलंदाज बनला आहे. त्याच्यापूर्वी लाराच्या नावे हा विक्रम होता. त्याने २००४ मध्ये इंग्लंड संघाविरुद्धच ५८२ चेंडू खेळताना ४०० धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. तेव्हा लाराने गॅरी सोबर्स यांचा ५७५ चेंडू खेळण्याचा विक्रम मोडला होता.
A truly remarkable landmark as a Test batsman.👏🏿
@K_Brathwaite has now faced more balls in a Test match than both @BrianLara & Sir Garry Sobers.👏🏿#WIvENG #MenInMaroon pic.twitter.com/2VepDlpIzX— Windies Cricket (@windiescricket) March 20, 2022
तसेच वेस्ट इंडिजकडून कोणत्या फलंदाजाने (ब्रेथवेट) एका कसोटी सामन्यादरम्यान ६०० पेक्षा जास्त चेंडू खेळण्याचीही ही पहिलीच वेळ आहे.
कसोटी मालिकेचा निकाल अंतिम सामन्यावरून
दरम्यान वेस्ट इंडिजने दुसरा कसोटी सामना अनिर्णीत राखत मालिका अतिशय रोमांचक स्थितीत आणली आहे. कारण यापूर्वीचा पहिला सामनाही अनिर्णीत राहिला होता. त्यामुळे ही मालिका सध्या ०-० अशा स्थितीत आहे. त्यामुळे या मालिकेचा निकाल शेवटच्या तिसऱ्या व शेवटच्या सामन्यावरून ठरेल. हा सामना २४ मार्चपासून सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप: फायनलमधील पराभवानंतरही लक्ष्य सेनने जिंकली करोडो मने; मोदी, सचिनकडूनही कौतुक
शुभमंगल सावधान! आयपीएल सुरू होण्यापूर्वी केकेआरचा दिग्गज अडकला लग्नबंधनात, फोटो व्हायरल
IPL 2022| सुरुवातीच्या षटकांमध्ये ‘हे’ पाच गोलंदाज प्रतिस्पर्धी संघांसाठी पडू शकतात महागात