---Advertisement---

फिफा विश्वचषक: सामना सुरु व्हायला काही तास बाकी असतानाच ब्राझीलला मोठा धक्का

On: शुक्रवार, जुलै 6, 2018 3:30 PM
---Advertisement---

ब्राझिल संघाचा डिफेंडर दानिलो लुईज डा सिल्वा पायाच्या दुखापतीमुळे फिफा विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

रशियात सुरू असलेल्या 21व्या फिफा स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत ब्राझिल बेल्जियम सामना होणार आहे. कझालन येथे होणाऱ्या या सामन्याला रात्री 11.30 सुरूवात होणार आहे.

26 वर्षीय दानिलो हा राहिलेल्या पुढील स्पर्धेला मुकणार हे ब्राझिल फुटबॉल कॉन्फिडरेशनने(सीबीएफ) स्पष्ट केले आहे.

“दानिलोच्या डाव्या पायाच्या घोट्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यातून तो लवकर बरा नाही होऊ शकत. यामुळेच तो संपुर्ण स्पर्धेत खेळू शकणार नाही”, असे सीबीएफने म्हटले आहे.

मात्र ब्राझिल संघातील दानिलोचे स्थान कायम आहे. तसेच तो संघाला प्रोत्साहन देण्यासाठी रशियातचं राहणार आहे.

दानिलो या स्पर्धेत फक्त एकच सामना खेळला आहे. 17 जूनला स्वित्झर्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात तो संघात खेळला होता. हा सामना 1-1 असा अनिर्णित राहिला.

या सामन्यातही मांडीच्या दुखापतीमुळे तो पुढील सामने नाही खेळू शकला. त्याच्या ऐवजी फॅगनरला शेवटच्या 11 मध्ये स्थान दिले.

ब्राझिलचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज बेल्जियमशी आहे.

हे दोन संघ याआधी चार वेळा एकमेकांच्या विरुद्ध खेळले आहेत. तीन सामन्यात ब्राझिलने बाजी मारली.

फिफा क्रमवारीत बेल्जियम 3ऱ्या आणि ब्राझिल 2ऱ्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘बाप योगायोग’- फिफा विश्वचषकात जुळून आलायं अनोखा योगायोग

फिफा विश्वचषक: बेल्जियम विरुद्ध ब्राझील…आज चुकीला माफी नाही!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment