---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिकमधील या व्हायरल फोटोची जगभरात धूम, अवघ्या काही तासांत मिळाले लाखो लाईक्स!

On: बुधवार, जुलै 31, 2024 4:09 PM
---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिक 2024 जसजसं पुढे जात आहे, तसतशी स्पर्धेची लोकप्रियता वाढत आहे. दररोज ऑलिम्पिकच्या विविध क्षणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकीच एका व्हायरल फोटोनं जगभरात खळबळ उडवून दिली आहे.

हा फोटो ब्राझिलियन सर्फर गॅब्रिएल मेडिनाचा आहे, जो पॅरिस ऑलिंपिकमध्ये पुरुषांच्या सर्फिंग राउंड 3 दरम्यान काढण्यात आला होता. हा फोटो अतिशय खास आहे. या फोटोला ‘एएफपी’सोबत काम करणाऱ्या प्रसिद्ध छायाचित्रकार जेरोम ब्रुइलेट यानं टिपलं आहे. त्यानं मेडिना याचा हवेत सर्फिंग करताना फोटो काढला, जो इंटरनेटवर वेगानं व्हायरल झाला.

जेरोम ब्रुइलेटनं या फोटोमागील कहानी सांगितली आहे. तो म्हणाला, मी हा फोटो तेव्हा घेतला, जेव्हा मेडिना हवेत बोर्ड घेऊन उजव्या हाताचं बोट आकाशाकडे दाखवत होता. ब्रुइलेट म्हणाला, मी स्वतः हा फोटो पाहून आश्चर्यचकित झालो आहे. त्यानं पुढे सांगितलं की, लाटा खूप उंच होत्या. अशा परिस्थितीत फोटो काढणं अवघड होतं. पण मी या परिस्थितीचा फायदा घेत चार फोटो काढले. त्यातील हा एक अप्रतिम शॉट होता.

सर्फर गेब्रियल मेडिनानं त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर हा फोटो पोस्ट करताच त्याला अल्पावधीतच 60 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले. फोटोमध्ये मेडिना हवेत हात फिरवताना दिसत आहे. हा फोटो इंटरनेटवर सध्या प्रचंड चर्चेत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर यूजर्स खूपच प्रभावित झाले आहेत. युजर्स या फोटोला ‘जादुई’ म्हणत आहेत.

फोटोग्राफर जेरोम ब्रुइलेटनं ऑलिम्पिकमधील अनेक क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. मात्र त्याच्या या फोटोनं कमालच केली. जगप्रसिद्ध टाईम्स मॅगझिननंही त्याच्या या फोटोचं कौतुक केलं असून त्याचा 2024 च्या सर्वोत्तम फोटोंमध्ये समावेश केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gabriel Medina (@gabrielmedina)

 

हेही वाचा – 

कोल्हापूरचा पोरगा ऑलिम्पिक फायनलमध्ये! नेमबाज स्वप्नील कुसाळे सुवर्ण पदकाचा वेध घेणार
पीव्ही सिंधूची पदकाच्या दिशेनं वाटचाल, राउंड ऑफ 16 मध्ये धडाक्यात एंट्री
7 महिन्यांची गर्भवती, तरीही ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला; या ॲथलीटच्या खुलाशाने जग हादरले 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---