---Advertisement---

ब्रेकिंग न्यूज! बीसीसीआयकडून आगामी झिम्बाब्वे दाैर्यासाठी भारतीय संघाची घोषणा!

On: सोमवार, जून 24, 2024 6:26 PM
---Advertisement---

यंदाच्या टी20 विश्वषकानंतर जुलैमध्ये भारतीय संघ झिम्बाब्वे दाैरा करणार आहे. ज्यामध्ये टीम इंडिया चार टी20 सामने खेळणार आहे. तर या दाैऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये नव्या खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. या मालिकेत शुबमन गिलकडे संघाची धुरा देण्यात आली आहे. या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघातील सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आले आहे.

आयपीएल 2024 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. त्यात ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, आवेश खान, मुकेश कुमार आणि रवी बिश्नोई यांचा समावेश आहे. बीसीसीआयने झिम्बाब्वेला नवीन खेळाडू पाठवण्याची घोषणा केली आहे.


भारताचा झिम्बाब्वे दाैरा

पहिला टी20 भारत विरुद्ध झिम्बाब्वे 6 जुलै : हरारे
दुसरा टी20 भारत विरुद्ध झिम्बाब्वे 7 जुलै : हरारे
तिसरा टी20 भारत विरुद्ध झिम्बाब्वे 10 जुलै : हरारे
चाैथा टी20 भारत विरुद्ध झिम्बाब्वे 13 जुलै : हरारे

 

भारताचा झिम्बाब्वे दाैऱ्यासाठी संघ-
शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नितीश रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे

महत्तवाच्या बातम्या-

वेस्ट इंडिज स्पर्धेतून बाहेर! जाणून घ्या दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवाची 3 मोठी कारणे
निर्णायक सामन्यात भारतीय संघास ‘या’ खेळाडूंपासून राहवं लागेल सावध, अन्यथा पुन्हा पदरी निराशाच!
स्मृती मंधाना सारखं कोणीच नाही! महिला क्रिकेटमध्ये रचला आणखी एक इतिहास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---