इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेचा आगामी हंगाम पुढच्या वर्षी खेळला जाणार आहे. आयपीएलसाठी भारतीय चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता पाहायला मिळते. आयपीएल 2024 बाबत शुक्रवारी (3 नोव्हेंबर) मोठी बातमी समोर आली. बीसीसीआयने आगामी आयपीएल हंगामासाठी खेळाडूंच्या लिलिवाची तारिख निश्चित केली आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगाम भारतात जोमात पार पडला. एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज संघाने मागच्या वर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकली. आघामी हंगामात देखील धोनीला खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच शुक्रवारी (3 नोव्हेंबर) अशी बामती समोर आली की, आयपीएल 2024 साठी बीसीसीआयने लिलावाची तारीख निश्चित केली. माध्यमांतील वृत्तांनुसार येत्या डिसेंबर महिन्यातील 19 तारखेला आयपीएल लिलाव आयोजित केला जाणार आहे. असेही सांगितले गेले आहे की, 26 नोव्हेंबर पर्यंत आयपीएल संघांकडे खेळाडूंना संघात रिटेन करण्यासाठी किंवा करारातून मुक्त करण्यासाठी वेळ दिला गेला आहे. (Breaking! Rain of money to be showered on players on ‘this’ date, date of IPL liliva fixed)
महत्वाच्या बातम्या –
अफगाणी गोलंदाजांचे कमाल कमबॅक! गुणतालिकेतील पाचवा क्रमांक जवळपास निश्चित, कराव्या लागणार फक्त ‘इतक्या’ धावा
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत धडक देणारे ‘हे’ आहेत चार संघ, जाणून उपांत्य सामन्यांचे वेळापत्रक