---Advertisement---

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत धडक देणारे ‘हे’ आहेत चार संघ, जाणून उपांत्य सामन्यांचे वेळापत्रक

Assam Cricket Team
---Advertisement---

देशांतर्गत क्रिकेटमटमधील टी-20 क्रिकेट स्पर्धा म्हणजेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी शेवटच्या टप्प्यात आली आहे. गुरुवारी (2 नोव्हेंबर) मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात स्थान मिळवलेले चार संघ समोर आले. उपांत्यपूर्व सामन्यात उत्तर प्रदेश, आसाम, विदर्भ आणि मुंबई संघांना पराभव मिळाला आणि उपांत्य सामन्यातून त्यांचा पत्ता कट झाला. दुसरीकडे पंजाब, दिल्ली, केरळा, आणि बरोदा या संघांनी उपांत्यपूर्व सामने जिंकल्यानंतर उपांत्य सामन्यांमध्ये आपले स्थान पक्के केले.

गुरुवारी (2 नोव्हेंबर) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे (Syed Mushtaq Ali Trophy) चारही उपांत्यपूर्व सामने खेळले गेले. मुल्लानपूर आणि मोहाली या दोन ठिकाणी प्रत्येकी दोन-दोन सामने आयोजित केले गेले होते. केरळ विरुद्ध आसाम आणि उत्तर प्रदेश विरुद्ध पंजाब हे सामने मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर आयोजित केले गेले होते. तसेच मुल्लानपूरच्या माहाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दिल्ली विरुद्ध विदर्भा आणि मुंबई विरुद्ध बडोदा हे सामने आयोजित केले गेले होते.

मोहालीत आयोजित पहिला उपांत्यपूर्व सामना उत्तर प्रदेशने पंजाबविरुद्ध 5 विकेट्स राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 3 विकेट्सच्या नुकसानावर 169 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाब संघाने 19.1 षटकात 5 विकेट्सच्या नुकसानावर 174 धावा कुटल्या आणि सामना नावावर केला. दुसरा उपांत्यपूर्व सामना केरळ विरुद्ध आसाम असा झाला. आसामने या सामन्यात 6 विकेट्स राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या केरळाने 6 विकेट्सच्या नुकसानावर 158 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आसाम संघाने 4 विकेट्सच्या नुकसानावर 162 धावा केल्या आणि उपांत्य सामन्यात स्थान पक्के केले.

स्पर्धेचा तिसरा उपांत्यपूर्व सामना मुंबई आणि बडोदा यांच्यात झाला. बलाढ्य मुंबई संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्सच्या नुकसानावर 148 धावांपर्यंत मजल मारू शकला. प्रत्युत्तरात बडोदा संघाने 7 विकेट्सच्या नुकसानावर 18.5 षटकांमध्ये 148 धावा केल्या आणि मुंबईचा उपांत्य फेरीचा मार्ग बंद केला. चौथा आणि शेवटचा उपांत्यपूर्व सामना दिल्लीने 39 धावांनी विदर्भा संघाविरुद्ध जिंकला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने 6 विकेट्सच्या नुकसानावर 176 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तार विदर्भ संघाला 20 षटकांमध्ये 9 विकेट्सच्या नुकसानावर 137 धावांपर्यंतच मजल मारता आली.

आता उपांत्यपूर्व सामन्यात विजय मिळवलेले संघ उपांत्य सामन्यांमध्ये आमने सामने असणार आहेत. शनिवारी (4 नोव्हेंबर) मोहालीमध्ये पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर हे दोन्ही उपांत्य सामने खेळले जाणार आहेत. पहिला सामना सकाळी 11 वाजता सुरू होणार असून यात पंजाब विरुद्ध दिल्ली अशी लढत पाहायला मिळेल. आसाम आणि बडोदा संघ दुसऱ्या उपांत्य सामन्यात खेळणार असून दुपारी 4.30 मिनिटांनी हा लढतीला सुरुवात होईल. (Syed Mushtaq Ali Trophy semi-finals to be played between Punjab, Delhi, Assam and Baroda teams)

महत्वाच्या बातम्या – 
आकाश चोप्राने रोहितचे नाव घेत केले मोठे वक्तव्य, म्हणाला, ‘कोणाचीही कारकीर्द उद्ध्वस्त…’
श्रीलंकेच्या लाजीरवाण्या पराभवानंतर तुटला माजी खेळाडूच्या अश्रूचा बांध! व्हिडिओ शेअर करत मांडल्या भावना

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---