ODI World Cup 2023क्रिकेटटॉप बातम्या

वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडला जबर धक्का! मॅचविनर आख्ख्या स्पर्धेतून बाहेर, ‘या’ खेळाडूला ताफ्यात मिळाली जागा

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा अर्धा टप्पा पार पडला आहे. एकीकडे, भारतीय संघाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, तर इतर संघांमध्ये यासाठी संघर्ष सुरू आहे. अशातच न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तसेच, त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूचीही घोषणा करण्यात आली आहे. चला तर, कोण आहे तो खेळाडू जाणून घेऊयात…

कोण आहे स्पर्धेबाहेर झालेला खेळाडू?
न्यूझीलंड (New Zealand) क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री विश्वचषक 2023 स्पर्धेतून बाहेर (Matt Henry Ruled Out From World Cup 2023) पडला आहे. हेन्रीला दुखापत झाल्यामुळे स्पर्धेतील पुढील सामन्यात खेळता येणार नाहीये. हॅमस्ट्रिंग ताणल्या गेल्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. यानंतर आता त्याचे खेळणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे, मॅट हेन्री (Matt Henry) याच्या जागी बदली खेळाडूची घोषणाही करण्यात आली आहे.

न्यूझीलंड क्रिकेट संघाने विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेची चांगली सुरुवात केली होती. संघाने सलग चार सामने जिंकले होते. मात्र, धरमशाला येथे भारताविरुद्ध पराभूत झाल्यानंतर त्यांनी लय गमावली. त्यांना पुढील तिन्ही सामन्यात सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशात न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीदेखील दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. हेन्रीच्या जागी संघात घातक वेगवान गोलंदाज काईल जेमिसन (Kyle Jamieson) याला सामील करण्यात आले आहे.

न्यूझीलंड क्रिकेट संघाने मॅट हेन्री हा दुखापतीमुळे बाहेर होण्याविषयी माहिती दिली आहे. त्यात त्यांनी सांगितले आहे की, “हेन्रीचा एमआरआय अहवाल आल्यानंतर त्याला ग्रेड दोन लोअर टियरची दुखापत झाल्याचे समजले. त्याला पूर्णपणे ठीक होण्यासाठी 2 ते 4 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तो आता पुढील सामन्यात खेळू शकणार नाही. त्याच्या जागी काईल जेमिसन याला ताफ्यात सामील करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.”

हेन्रीचे स्पर्धेतील प्रदर्शन
खरं तर, मॅट हेन्री याने विश्वचषक 2023 स्पर्धेत आतापर्यंत शानदार प्रदर्शन केले होते. त्याने 7 सामन्यात 28च्या सरासरीने 11 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे न्यूझीलंड संघासाठी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याचे स्पर्धेबाहेर होणे कोणत्याही धक्क्यापेक्षा कमी नाहीये. मात्र, त्याच्या जागी जेमिसनला संघात सामील करण्यात आले आहे. त्याने आतापर्यंत एकूण 13 वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याला 14 विकेट्स घेण्यात यश आले आहे. (this player ruled out from the remaining world cup 2023 matches due to injury big blow for new zealand team)

हेही वाचा-
श्रीलंकेच्या लाजीरवाण्या पराभवानंतर तुटला माजी खेळाडूच्या अश्रूचा बांध! व्हिडिओ शेअर करत मांडल्या भावना
बिग ब्रेकिंग! तब्बल 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नेपाळ संघ 2024च्या टी20 वर्ल्डकपसाठी पात्र

Related Articles