इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अजून काही महिन्यांचा वेळ आहे. मात्र, त्यापूर्वी काही संघांमध्ये मोठे बदल झाले आहेत. अशात मोठी बातमी समोर येत आहे. गुजरात टायटन्स संघाने आपला कर्णधार हार्दिक पंड्या याला रिलीज केले आहे. पंड्या आता मुंबई इंडियन्स संघाकडून खेळेल. अशात, युवा फलंदाज शुबमन गिल गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार बनला आहे. विशेष म्हणजे, संघात केन विलियम्सन यासारखा अनुभवी खेळाडू असताना 24 वर्षीय शुबमन गिलकडे कर्णधारपद सोपवल्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत.
क्रिकेट संचालकाचे विधान
गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचे क्रिकेट संचालक विक्रम सोलंकी म्हणाले की, “शुबमन गिल याने मागील 2 वर्षांमध्ये खूपच प्रगती केली आहे. आम्ही त्याला फक्त एका फलंदाजाच्या रूपात नाही, तर क्रिकेटमध्ये एका लीडरच्या रूपातही परिपक्व होताना पाहिले. मैदानावर त्याच्या योगदानाने गुजरात टायटन्स संघाला एक मजबूत ताकदीच्या रूपात उभे राहण्यात मदत केली. त्याची परिपक्वता आणि कौशल्य मैदानावरील प्रदर्शनातून स्पष्टपणे दिसते. आम्ही त्याला कर्णधार बनवण्यासाठी उत्साही आहोत.”
Shubman Gill, 24-year old, announced captain of Gujarat Titans for IPL 2024. #IPL2024 pic.twitter.com/mzRMxUCnNe
— Bharath Seervi (@SeerviBharath) November 27, 2023
गिलचा कारनामा
शुबमन गिल (Shubman Gill) हा आयपीएल 2023 स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने ऑरेंज कॅप नावावर केली होती. त्याने 17 सामन्यात फलंदाजी करताना 59.33च्या सरासरीने 890 धावा केल्या होत्या. केन विलियम्सन हादेखील गुजरात टायटन्सचा कर्णधार बनण्याच्या शर्यतीत होता, पण फ्रँचायझीने भविष्य लक्षात घेता या 24 वर्षीय भारतीय युवा खेळाडूला प्राधान्य दिले.
शुबमन गिलचा आयपीएल प्रवास
शुबमन गिलने 2018मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून आयपीएल पदार्पण केले होते. त्याने त्याच्या कारकीर्दीत आतापर्यंत 91 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 37.70च्या सरासरीने 2790 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 3 शतके आणि 18 अर्धशतकेही निघाली आहेत. 129 ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने आपल्या आयपीएल कारकीर्दीत 273 चौकार आणि 80 षटकारांचीही बरसात केली आहे. आयपीएल 2023 लिलावापूर्वी गुजरातने त्याला 8 कोटी रुपयांमध्ये साईन केले होते. (breaking Shubman Gill is now the Gujarat Titans captain as Hardik Pandya returns to Mumbai Indians)
हेही वाचा-
BREAKING: अखेर हार्दिक पंड्या मुंबईच्या ताफ्यात, स्वत: IPLने दिली अधिकृत माहिती
‘मी निर्भीड होऊन…’, Player of The Match बनताच यशस्वी जयसवालचा मोठा खुलासा