---Advertisement---

मोठी बातमी! ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्याने, विनेश फोगटची कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा..!

On: गुरूवार, ऑगस्ट 8, 2024 7:25 AM
---Advertisement---

ऑलिम्पिक मधून मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटने आज गुरुवारी (8 ऑगस्ट) कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगट खूपच नाराज झाली होती. वजन जास्त असल्याने तिला बुधवारी (7 ऑगस्ट) अंतिम सामन्यातून ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित करण्यात आले होते.

विनेश फोगटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर भावनिक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. ती म्हणाली की “आई, माझ्यासोबत कुस्तीने सामना जिंकला, मी हरले, माफ कर, तुझे स्वप्न, माझे धैर्य सर्व तुटले आहे, माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद नाही.  मी तुम्हा सर्वांचा सदैव ऋणी राहीन, क्षमस्व. अलविदा कुस्ती 2001-2024”

29 वर्षीय महिला कुस्तीपटूने उपांत्य फेरीच्या सामन्यात क्यूबन कुस्तीपटू गुझमन लोपेझचा 5-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश करत इतिहास रचला होता. ऑलिम्पिक स्पर्धेत अशी कामगिरी करणारी ती देशातील पहिली महिला कुस्तीपटू ठरली. अशाप्रकारे त्याला 50 किलो कुस्ती प्रकारात रौप्य पदकही निश्चित होते. किमान एक तरी पदक निश्चित असल्याचा विश्वास संपूर्ण देशाला वाटत होता. परंतु फायनलपूर्वी तिचे वजन 100 ग्रॅम अधिक असल्याचे दिसून आले. परिणामी तिला ऑलिम्पिक मधून अपात्र करण्यात आले होते.

हेही वाचा-

मोठी बातमी! ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्याने, विनेश फोगटने कुस्तीतून निवृत्ती घेतली
“जोपर्यंत मी कर्णधार आहे तोपर्यंत…” पराभवानंतर रोहित शर्मानं दिला खेळाडूंना पाठिंबा
27 वर्षानंतर श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत भारताचा दारुण पराभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---