केनियाच्या एलिवुड किपचॅगेने काळ नवीन विश्वविक्रम प्रस्थापित करताना अर्ध मॅरेथॉनमध्ये जगातील सर्वात वेगवान मानव होण्याचा मान मिळविला. ही स्पर्धा त्याने फक्त२ तास आणि २४ सेकंदात जिंकली. परंतु दोन तासात ही स्पर्धा जिंकण्याच त्याच स्वप्न फक्त २४ सेकंदांनी भंगल!
अधिकृत नसलेली ही मॅरेथॉन इटलीमधील फॉर्मुला वनच्या मोंझा ट्रॅकवर झाली. यात फक्त तीन धावपटुनी भाग घेतला होता. जगविख्यात स्पोर्ट्स वेअर कंपनी नायकेने या स्पर्धेचं आयोजन केलं होत.
यापूर्वीचा अर्ध मॅरेथॉनचा विक्रम केनियाच्याच डेनिस किमेत्तोच्या नावावर होता. त्याने २०१४ साली बर्लिन अर्ध मॅरेथॉन २ तास, २ मिनिट आणि ५७ सेकंदात पूर्ण केली होती.
एलिवुड किपचॅगे आजपर्यंत २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक, २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक तर २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेता आहे.
2:00:24… almost #Breaking2
An incredible run by Eliud Kipchoge. pic.twitter.com/rYXd1VWuMq— AW (@AthleticsWeekly) May 6, 2017